actress malaika Arora latest yoga video viral on internet actress said namaste everyone 
मनोरंजन

मलायकाचा व्हिडिओ व्हायरल; असा योगा कोणी करतं का?

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - मलायका सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारे नाव आहे. तिच्या फॅन फ़ॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. सध्या ती चित्रपट नव्हे तर रियॅलिटी शो आणि योगा यामुळे जास्त लाईमलाईट मध्ये राहणारी सेलिब्रेटी आहे. जीमच्या बाहेर मलायकाची छबी टिपण्यासाठी फोटोग्राफर गर्दी करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. सध्या तिनं आपल्या इंस्टावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. ते फोटो व्हायरल झाले आहेत. यापूर्वीही मलायकाच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. चाहत्यांच्या आवडीचे फोटो शेअर करुन त्यांच्याशी संवाद साधण्यात मलायका अग्रेसर आहे. ती तिची वेगळी ओळख म्हणावी लागेल.

आता मलायका चर्चेत आली आहे त्याचे कारण म्हणजे तिचा योगा करतानाचा फोटो. त्या फोटोनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मलायकानं डोक्यावर उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे. योगाच्या एका मुद्रेमध्ये तिनं हा प्रयत्न केला आहे. त्यात तिला अनेकदा अपयश आले आहे. मलायकाच्या त्या पोझला चाहत्यांनी पसंती मिळाली आहे. त्यावरुन तिला अनेकांनी ट्रोलही केले आहे. त्याबद्दल मलायकानं लिहिलं आहे की, आपल्याला जे हवं ते मिळाल्यानंतर पुढे जाण्याची गरज असते. याचा विचार आपण करायला लागतो. अनेकदा त्या गोष्टी विसरुन जातात. मी तर आठवड्यातून एकदा हे आसन करते. त्यामुळे मला फायदा होतो.

प्रत्येकानं योगा करण्याची गरज आहे. आपण ज्यावेळी योगातील एक - एक आसनं शिकत जातो तसे आपल्या व्यक्तिमत्वात बदल होण्यास सुरुवात होते. मात्र अनेकदा ते लक्षात येत नाही. योगात यश मिळवण्यासाठी सातत्य, परिश्रम करण्याची गरज आहे. योगा करायला सर्वच वेळ चांगली आहे. तरी देखील जोपर्यत आपल्याला योगात यश मिळत नाही. तोपर्यत ती गोष्ट सोडायची नाही. असे मला वाटते. प्रयत्न करायलाच हवा. मलायकाच्या त्या व्हिडिओला पहिल्या तासांत काही हजारो लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या होत्या. आता त्याची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे.

मलायकानं डान्सच्या आधारे बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ती सध्या काही रियॅलिटी शो मध्ये परिक्षक म्हणून दिसते आहे. त्यालाही चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाळीशी ओलांडलेल्या मलायकानं आतापर्यत अनेक प्रकारचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. छैया - छैया, मुन्नी बदनाम यासारख्या गाण्यातून तिनं वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT