actress malaika arora shares her beautiful photos to wish holi trollers troll  
मनोरंजन

'हिचा नुसता थाट पाहून घ्यावा, काय रंग लावलायं'; कसली नटलीयं

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - एकीकडे देशात कोरोनानं थैमान घालण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी होळीच्या निमित्तानं मोठं सेलिब्रेशन केलं आहे. धुलीवंदनाच्या दिवशी अनेक कलाकारांनी आपआपल्या घरी मोठमोठ्या पार्ट्यांचं आयोजन केल्याचे दिसून आले आहे. कित्येकांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्या कलावंतांच्या चाहत्यांची त्याला पसंती मिळताना दिसत आहे. यातच मलायका अरोरानं केलेलं फोटोशुट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यापूर्वी तिनं होळीच्या दिवशी ज्यापध्दतीनं शुभेच्छा दिल्या होत्या त्या पाहून चाहते नाराज झाले होते. ती ट्रोल झाली होती. दरवेळी वेगळ्या पध्दतीचा लूक करुन चाहत्यांची वाहवा मिळवण्यात मलायकाचं नाव सर्वात प्रथम घ्यावे लागेल.

सोशल मीडियावर होळीच्या निमित्तानं अनेक सेलिब्रेटींनी साजरा केलेल्या उत्सवाचे फोटो शेअर केले आहेत. अशातच नेहमीप्रमाणं मलायकाच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिनं दोन फोटो शेअर केले आहेत. मात्र त्याला नेटक-यांनी ट्रोल केले आहे. काहींची तिला पसंतीही मिळाली आहे. तसेही बॉलीवूड कलाकारांची होळी पाहण्यासारखी असते. असे म्हटले जाते. आता त्याला थोडं वेगळं स्वरुप आलं आहे. यावेळी सगळ्या सणांवर कोरोनाचे सावट असल्यानं त्याचा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे. मलायकाच्या फोटोनं चाहत्यांना खुश केलं आहे. इंस्टावर तिनं दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात त्या फोटोंमध्ये मलायकाचा थोडासा रंगीत लूक पाहता येणार आहे.

बोल्ड फोटो शेअर करुन चाहत्यांची पसंती मिळवण्यात मलायका सगळ्यात पुढे असते. तिचे जीममधील तसेच योगा करतानाचे फोटो चाहत्यांना सर्वाधिक आवडतात. ही गोष्ट मलायकाच्या चाहत्यांना माहिती आहे. त्यामुळे ते तिच्या नवनवीन फोटोंना सातत्यानं लाईक्स करताना दिसतात. मलायकाचा सोशल मीडियावर असणारा फॅनफॉलोअर्सही मोठा आहे. दोन दिवसांपूर्वी आपल्या एका मैत्रीणीच्या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो शेअर केला होता. त्यात ती आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर एकत्र असलेला तो फोटो होता. त्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती.

आता मलायकानं होळीच्या निमित्तानं जो एक फोटो पोस्ट केला आहे त्यात ती पाठमोरी उभी आहे. आणि तिनं चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इंस्टावर शेअर केलेल्या या फोटोला जोरदार लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत. अनेकांनी तिचं कौतूक केलं आहे तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. अशाप्रकारे फोटो शेअर करुन मलायकानं चाहत्यांचा राग ओढावून घेतला आहे. तिनं लिहिलं आहे की, माझ्या सर्व चाहत्यांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही सर्वजण घरात सुरक्षित राहा. असे आवाहन करण्यात आले आहे. 
 
 
 

 
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Kuno Cheetah: भारतात चित्त्यांचे 'अर्धशतक' पूर्ण! ज्वालाने दिला ५ पिल्लांना जन्म; कूनोमध्ये आता चित्त्यांची संख्या ५३ वर!

Maharashtra U23 Women Cricket: महिला २३ वर्षाखालील क्रिकेट; महाराष्ट्राने तमिळनाडूवर ८ विकेटने मात

SCROLL FOR NEXT