actress malaika arora trolled on advance wishing holi with her bold photo  
मनोरंजन

'बदनाम तर तु केव्हाच झाली आहेस'; हॉट फोटो टाकून मलायका ट्रोल

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रसिध्दीसाठी कधी कोण काय करेल याचा भरवसा नाही. त्याचे कारण म्हणजे हल्ली प्रत्येक सेलिब्रेटीला चर्चेत राहायला आवडते. प्रख्यात अभिनेत्री मलायकाही त्याला अपवाद नाही. सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी म्हणून तिचे नाव घ्यावे लागेल. तिनं होळीच्या निमित्तानं चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यासाठी तिनं जो फोटो शेअर केला आहे त्यामुळे ती चर्चेत आली आहे. नेटक-यांनी तिला ट्रोल केले आहे. होळीच्या दिवशी अशा प्रकारचा फोटो पोस्ट करुन मलायकला नेमकं काय सांगायचे आहे, असा प्रश्न नेटक-यांनी यावेळी केला आहे. मात्र त्याचा मलायकावर काहीही परिणाम झालेला नाही. त्या फोटोला तिच्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

बोल्ड फोटो शेअर करुन चाहत्यांची पसंती मिळवण्यात मलायका सगळ्यात पुढे असते. तिचे जीममधील तसेच योगा करतानाचे फोटो चाहत्यांना सर्वाधिक आवडतात. ही गोष्ट मलायकाच्या चाहत्यांना माहिती आहे. त्यामुळे ते तिच्या नवनवीन फोटोंना सातत्यानं लाईक्स करताना दिसतात. मलायकाचा सोशल मीडियावर असणारा फॅनफॉलोअर्सही मोठा आहे. दोन दिवसांपूर्वी आपल्या एका मैत्रीणीच्या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो शेअर केला होता. त्यात ती आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर एकत्र असलेला तो फोटो होता. त्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती.

आता मलायकानं होळीच्या निमित्तानं जो एक फोटो पोस्ट केला आहे त्यात ती पाठमोरी उभी आहे. आणि तिनं चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इंस्टावर शेअर केलेल्या या फोटोला जोरदार लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत. अनेकांनी तिचं कौतूक केलं आहे तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. अशाप्रकारे फोटो शेअर करुन मलायकानं चाहत्यांचा राग ओढावून घेतला आहे. तिनं लिहिलं आहे की, माझ्या सर्व चाहत्यांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही सर्वजण घरात सुरक्षित राहा. असे आवाहन करण्यात आले आहे.

काही युझर्सला मलायकाचा शुभेच्छा देण्याचा अंदाज पसंत आला आहे. त्याशिवाय तिच्या पर्सेनॅलिटीचं कौतूक केलं आहे. बदनाम तर तु झाली आहेस असे एका युझर्सनं लिहिलं आहे. लोकांना केवळ मुर्ख बनवण्यासाठी यांना फक्त एक कारण हवे असते. या शब्दांत एका चाहत्यानं ट्रोल केलं आहे. 
 
 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

Multibagger Stocks: 1 लाखाचे 30 लाख! Market Crash असताना या 3 शेअर्सने गुंतवणूकदारांना केल मालामाल

'धुरंधर २' मध्ये फक्त ५ सेकंद दिसली पण पैसे किती मिळाले माहितीयेत? अनेकांचा वर्षाचा पगार नाही तितका

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

SCROLL FOR NEXT