actress model lisa haydon flaunt baby bump in pose actress photo goes viral on internet  
मनोरंजन

लिझाच्या गरोदरपणाची चर्चा, फोटोशुटची वाहवा; सोशल मीडियावर लाईक्स, कमेंटसचा पाऊस  

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - आपल्या वेगळ्या स्वभावामुळे लिझानं बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ती फार प्रसिध्द अशी अभिनेत्री नसली तरी तिनं आतापर्यत जे चित्रपट केले आहेत त्यामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्य़ा तिचे बेबी बंप फ्लॉन्ट फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंना तिच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी तिला लाईक्स आणि कमेंटस करुन शुभेच्छाही दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्रेग्नंसीचे फोटो काढण्याचा वेगळा ट्रेंड भलताच लोकप्रिय होताना दिसत आहे. केवळ परदेशातच नाही तर भारतातही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लिझा ही तिस-यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिनं आपलं फोटोशुट केलं. आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्या फोटोंमध्ये बेबी फ्लाँन्ट करताना दिसत आहे. ज्याला तिच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. लिझाचा त्या फोटोंमध्ये एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. फोटो, व्हिडिओ शेअर करुन ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. आता लिझा तिस-यांदा आई होणार आहे. त्यानिमित्तानं जे फोटो शेअर केले आहेत ते खास आहेत. त्या फोटोंमध्ये लिझाचा अंदाज आणि स्टाईल दोन्ही लोकप्रिय झाल्या आहेत.

लिझाच्या त्या फोटोशुटला आतापर्यत लाखो लाईक्स आणि शेकडो कमेंटस मिळाल्या आहेत.त्या फोटोंविषयी सांगायचे झाल्यास ती त्या फोटोंमध्ये जम्प सुट परिधान केलेली दिसत आहे. त्याबद्दल लिझानं लिहिलं आहे की, कधी कधी मला असे वाटते की मुलं किती लवकर मोठी होतात. हे माझ्यासाठी खुप आनंदाची आणि समाधानाची बाब म्हणावी लागेल. त्यावर कमेंट करताना एका युझर्सनं लिहिले आहे की, क्युट..तु फार गो़ड दिसते आहेस. यापूर्वी देखील लिझानं अशाप्रकारचे फोटोशुट केले आहेत. त्यावेळी ते फोटोशुटही कमालीचे लोकप्रिय झाले होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी लिझाचा एक व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. त्यात ती आपल्या मुलाबरोबर गप्पा मारताना दिसत होती. त्यालाही तिच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी तिच्या त्या फोटोचे कौतूकही केले होते. लिझाच्या वेगळ्या अंदाजाचे सर्वांनी स्वागतही केले होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT