actress model natasa stankovic fun in swimming pool with husband hardik pandya son agastya
actress model natasa stankovic fun in swimming pool with husband hardik pandya son agastya 
मनोरंजन

स्विमिंग पूलमध्ये पोहतोय ज्युनिअर पांड्या; फोटो कसला भारीयं !

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या पत्नीनं म्हणजे अभिनेत्री नताशा स्टेनकोविकनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोची इंस्टवर स्टोरी तयार केली असून त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. नताशानं यापूर्वी ज्युनिअर पांड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्याला त्या दोघांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. आता जो नताशानं जो फोटो शेअर केला आहे त्यात ज्युनिअर पांड्या स्विमिंग पूलमध्ये पोहत असल्याचे दिसत आहे. तो फोटो चाहत्यांच्या कौतूकाचा वर्षाव होत आहे. कित्येकांनी त्या फोटोला मोठ्या संख्येनं कमेंटही दिल्या आहेत.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनविक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. ते नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेअर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. आताही नताशानं छोट्या पांड्याचा शेअर केलेला फोटो सर्वांना कमालीचा आवडला आहे. त्या फोटोमध्ये नताशा ज्युनिअर पांड्याला पोहण्यास शिकवताना दिसत आहे. ज्युनिअरनंही वेगळी पोझ दिली आहे. त्यावेळी हार्दिक पांड्या मागे उभा राहून त्या दोघांकडे पाहून हसत आहे. सध्या नताशा हार्दिक बरोबर टाइम स्पेंड करताना दिसत आहे. नताशा जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे त्याला कॅप्शन देण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे.

नताशाच्या त्या फोटोला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स केले आहेत. नताशाचा तो फॅमिली फोटो सर्वांसाठी एक वेगळी पर्वणी ठरला आहे. त्यामुळे फॅन्सनं तिला खूप सा-या कमेंटही दिल्या आहेत. त्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे की, अगस्त्य 30 मार्चला 8 महिन्यांचा झाला आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी नताशानं इंस्टावर एक व्हिडिओ तयार केला होता. त्यात तिनं डॉन्ट रश नावाचं गाणं तयार केलं होतं. त्यावेळी अगस्त्यला घेऊन हार्दिक पांड्या नाचत असल्याचे दिसून आले होते. नताशा आणि हार्दिकनं गेल्या 2020 मध्ये लग्न केले होते. तर जुलै 2020 मध्ये तिनं अगस्त्यला जन्म दिला होता.

नताशा ही एक सर्बियिन मॉडेल आहे. अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिनं आपल्या करिअरला सुरुवात मॉडेलिंग पासून केली होती. 2013 मध्ये आलेल्या सत्याग्रह चित्रपटातून तिनं डेब्यु केला होता. मात्र जेव्हा तिनं बादशाह बरोबरच्या डिजे वाले बाबु मधून प्रसिध्दी मिळवली. नताशा ही बिग बॉसच्या आठव्या सीझनची स्पर्धक देखील राहिली आहे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT