actress model nikki tamboli trolled  Team esakal
मनोरंजन

'निक्की तुला लाज कशी वाटत नाही, असे कपडे घालायला'

सोशल मीडियावर निक्कीच्या नावाचा बोलबाला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या फॅशनसाठी ओळखलेल्या गेलेल्या निक्कीला आता लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे तिचे कपडे. निक्कीनं सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल केले आहेत. त्यात तिचे काही हॉट फोटोही आहेत त्या फोटोंमुळे निक्की ट्रोल झाली आहे. अशाप्रकारचे कपडे घातल्यावर लोकं कौतूक कमी नावं जास्तच ठेवणार याप्रकारच्या कमेंट तिला आल्या आहेत. निक्की नेहमीच तिच्या वेगळ्या हॉट लुकसाठी ओळखली जाते. सध्याच्या तिच्या फोटोला नेटक-यांनी प्रतिक्रिया देण्याची सभ्यता ओलांडली आहे. त्यामुळे निक्कीला यापुढे फोटो शेअर करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

सोशल मीडियावर निक्कीच्या नावाचा बोलबाला आहे. निक्कीचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. बिग बॉसमधील स्पर्धक असणा-या निक्कीन यंदा मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळवली होती. त्याचा तिला फाय़दाही झाला. सध्या ती तिच्या हॉट अंदाजामुळे चर्चेत आली आहे. त्यावरुन तिला नेटक-यांच्या ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. सुपर सेक्सी लुक म्हणून तिनं काही फोटो शेअऱ केले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात वाह्यात कमेंटचा भरणा अधिक आहे.

वेगवेगळ्या कपड्यांमधील निक्कीच्या फोटोंना पसंतीपेक्षा टीकाच अधिक प्रमाणात झेलावी लागत असल्याचे दिसून आले आहे. त्या फोटोंमध्ये निक्कीनं ब्लॅक कलरची शॉर्ट लेंथचा ड्रेस घातला आहे. त्या ड्रेसमध्ये फ्रंट एन्डच्या बॅक अप डीप कट नेकलाईन्स दिसत आहे. त्याच्याबरोबर तिनं स्ट्रेप्सही लावली आहे. एका सॅटन मेड आउटफिटमध्ये तिचा लूक एकदम हॉट दिसत आहे. त्याला अतिशय बोल्ड स्वरुपात शुट करण्यात आले आहे.

निक्कीच्या अशाप्रकारच्या कपडयांकडे बघुन तिला ट्रोल करण्यात आले आहे. काहींनी तिला अश्लील भाषेत कमेंट केल्या आहेत. काहींनी अशाप्रकारचे फोटो पोस्ट करुन निक्की तुला नेमकं काय सांगायचं आहे असा प्रश्नही तिला विचारला आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, पैसा माणसाकडून काय काय करुन घेतो. एकानं तिला चांगलेच सुनावले आहे, निक्की तुला थोडी सुध्दा लाज कशी नाही, असे कपडे कोणी घालतं का, या भाषेत कमेंट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : - नागपूर जिल्ह्यातून दोन संशयितांना अटक , पाकिस्तानशी संबंधीत असल्याने एटीएसला शंका

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT