actress model sofia hayat recalls holi party incident says one guy put his hand up my skirt  
मनोरंजन

बॉलिवूडमध्ये होळीच्या पार्टीतही घडतात छेडछाडीचे प्रसंग; सोफियाने सांगितला किस्सा!

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - होळीच्या निमित्तानं बॉलीवूड सध्या पार्टीच्या मुडमध्ये आहे. अनेक सेलिब्रेटींच्या घरी मोठमोठ्या पार्टीचे आयोजन केले जात आहे. त्या पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या अभिनेत्री सोफियाच्या बाबत घडलेला एक किस्सा चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे एका पार्टीमध्ये तिच्या सोबत जे काही घडलं ते तिनं शेअर केलं आहे. त्यावरुन तिनं खंत व्यक्त केली आहे. सोफिया सोशल मीडियावर चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. ती कायम तिच्या हॉट फोटोंमुळे चाहत्यांची पसंती मिळवताना दिसते. आता सोफिय़ानं धक्कादायक खुलासा केला आहे. त्यात तिच्या वाट्याला अनपेक्षित असा प्रकार आला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या सोफीनं संबंधित व्यक्ती विरोधात तक्रार करण्याचा निर्णयही घेतल्याचे समजते.

त्याचे झाले असे की, होळीची पार्टी सुरु होती. त्यावेळी एका व्यक्तीनं सोफीयाशी अश्लील वर्तन केलं. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. असा आरोप सोफियानं केला आहे. त्यावेळी सोफियाला पार्टीत असल्यानं फारसं काही कळलं नाही. मात्र तिनं तेव्हाच त्या व्यक्तीला अशाप्रकारचे कृत्य केल्याप्रकरणी चांगलीच अद्दल घडवल्याचेही सोफियानं सांगितलं. सोफियानं आपली एक हॉट इमेज तयार केली आहे. ती कायमच सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर करत असते. ज्यावेळी सोफियासोबत असा प्रकार घडला त्यावेळी त्याठिकाणी काही सेलिब्रेटीही होते. काही जण माझे फोटो घेण्याच्या तयारीत होते. अशावेळी मी जरा सावध होते.

ज्या व्यक्तीनं माझ्याशी बेशिस्तपणे वर्तन केले त्याने पानी पुरी खाल्ली होती. त्यात भांग टाकण्यात आली होती. हे काही मला माहिती नव्हते आणि कुणी मला त्याविषयी काही सांगितलेही नाही. सोफिया म्हणाली की, भांगमुळे मी तर फार आनंदित झाले होते. मी सगळ्यांबरोबर फोटो काढत होते. त्यावेळी एका व्यक्तीनं माझ्या स्कर्टवर हात ठेवला. पहिल्यांदा मला वाटले असे काही होणार नाही. कदाचित माझा भ्रम झाला असेल. दुस-यांदाही असाच प्रकार घडला. त्यानंतर मी त्याच्या छातीत जोरदारपणे ठोसा मारला. आणि तो फरशीवर पडला.   


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Politics : ये मेरा शहर…’ पालिका निकालांनी सांगलीत उभे केले नवे धुरंधर, जुन्या समीकरणांना धक्का

Horoscope 2026 : मंगळ गोचरमुळे बनतोय रूचक राजयोग; मकर संक्रांती नंतर चमकणार 'या' 5 राशींचे भाग्य, मिळणार यश अन् भरपूर पैसा

Latest Marathi News Live Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग, सुदैवाने कुणालाही इजा नाही

Doodh Soda: ‘धुरंधर’मुळे व्हायरल झालेलं पाकिस्तानमधील पेय नेमकं काय? जाणून घ्या दूध सोडा कसा बनवायचा

'माझं शरीर निकामी व्हायची वेळ आली होती' अमृता सुभाषने कसा केला डिप्रेशनचा सामना, अभिनेत्री म्हणाली...

SCROLL FOR NEXT