munmun dutta 
मनोरंजन

'तारक मेहता..' सोडण्याच्या चर्चांवर अखेर 'बबिता'चं स्पष्टीकरण

मुनमुन 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोडणार आहे अशी सोशल मीडियावर चर्चा

प्रियांका कुलकर्णी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (munmun dutta) सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील मुनमुनच्या बबिता या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मुनमुन मालिका सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. याबद्दल या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, 'मालिकेमध्ये बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताबद्दल अशी अफवा पसरत आहे की, ती मालिका सोडणार आहे. हे खोटे आणि चुकीचे आहे.' आता खुद्द मुनमुनने या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. (actress munmun dutta explains absence from taarak mehta ka ooltah chashmah)

एका मुलाखतीमध्ये मुनमुनने सांगितले, 'गेल्या 2-3 दिवसांपासून माझ्याबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. त्या गोष्टींचा माझ्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. काही लोक म्हणत आहे की मी मालिकेच्या शूटिंगला गैरहजर होते, हे खोटं आहे. खरी गोष्ट अशी आहे की, त्या एपिसोडमध्ये माझ्या भूमिकेचे काही काम नसल्याने मी शूटिंगला गेले नाही. मालिकेचे निर्माते हेच एपिसोड्स आणि सीन्स ठरवतात. मी नाही ठरवत. मी फक्त त्या मालिकेमधील एक भूमिका साकारणारी कलाकार आहे. त्यामुळे जर माझं त्या एपिसोडमध्ये काही काम नसेल तर मी शूटिंगला जाणार नाही.'

मालिका सोडण्याबाबात मुनमुन म्हणाली, 'जर मी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला तर मी ते माझ्या चाहत्यांना नक्की सांगेन. कारण ते या मालिकेसोबत आणि माझ्या भूमिकेसोबत भावनिक दृष्ट्या जोडले गेले आहेत. त्यामुळे फक्त अंदाज लावण्यापेक्षा सत्य जाणून घेण्याचा अधिकार त्यांना आहे.'

काही दिवसांपूर्वी मुनमुन तिच्या युट्यूब चॅनेलवरील एका व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. या व्हिडीओमध्ये तिने जातीवाचक शब्द वापरले होते. याप्रकरणी सोशल मीडियावर तिच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. नंतर चूक लक्षात आल्याने मुनमुने सोशल मीडियावर माफीनामा सादर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT