actress nimisha sajayan marathi movie hawahawai will release on 7th october directed by mahesh tilekar
actress nimisha sajayan marathi movie hawahawai will release on 7th october directed by mahesh tilekar  sakal
मनोरंजन

मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयन मराठीत, 'या' दिवशी 'हवाहवाई' प्रदर्शित..

नीलेश अडसूळ

mahesh tilekar movie : 'द ग्रेट इंडियन किचन" यासारख्या बहुचर्चित तसेच अनेक मल्याळम सिनेमातून आपल्या अभिनयाची जादू दाखवलेली अभिनेत्री निमिषा सजयन (nimisha sajayan) आता "हवाहवाई" (hawahawai marathi movie) या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. हवाहवाई हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून अभिनेत्री निमिषा सजयन आणि अभिनेता विजय आंदळकर ही नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

(actress nimisha sajayan marathi movie hawahawai will release on 7th october directed by mahesh tilekar)

मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे "हवाहवाई" चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी या चित्रपटातलं उडत्या चालीचं एक गाणं गायलं आहे. निमिषा सजयन पदार्पण, आशा भोसले यांचं गाणं या मुळे "हवाहवाई" हा चित्रपट चर्चेत आहे. अक्षयकुमार, जयाप्रदा, हेलन या हिंदी कलाकारांनी महेश टिळेकर यांच्याच चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यात आता निमिषा सजयन या नावाचीही भर पडत आहे.

स्वयंपाकघरात टिफिन हातात घेऊन उभं असलेलं जोडपं या मोशन पोस्टरमध्ये दिसत आहे. महेश टिळेकर यांच्या आधीच्या "वन रूम किचन" या मराठी सिनेमा सारखा "हवाहवाई" हा सुद्धा कौटुंबिक चित्रपट असणार असा अंदाज बांधता येतो. चित्रपटातील बाकी कलाकार कोण? कथा काय? अशा प्रश्नांची उत्तरंही लवकरच मिळणार आहेत. मात्र मोशन पोस्टरमुळे आता ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT