Janhit Mein Jaari: बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सुरु असताना काही वेगळ्या विषयांवरचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास अभिनेत्री नुसरत भरुचाच्या जनहित में जाही या चित्रपटाविषयी (Bollywood vs Tollywood) सांगावे लागेल. कंडोम या विषयावर प्रबोधनात्मक चित्रपट निर्मिती करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सध्या (Viral Trailer) नुसरत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्या दरम्यान एका मुलाखतीमध्ये जेव्हा नुसरतला कंडोन या विषयी कधी आणि कसे माहिती झाले असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. नुसरतनं त्या चित्रपटामध्ये कंडोम विक्रेतीची भूमिका केली आहे.
नुसरतच्या प्यार का पंचनामा, सोनू के टीटू की स्वीटी, छोरी सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे, बॉलीवूडमध्ये सध्याची आघाडीची अभिनेत्री (bollywood Actress) म्हणून नुसरच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. नुसरतला जेव्हा कंडोम या विषयावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, मला वाटतं की, मी फार नशीबवान आहे की, आम्हाला शाळेत बायोलॉजी आणि सेक्स (Bollywood news) एज्युकेशनच्या बाबत शिक्षण दिले जात होते. त्यामुळे (Social media news) कंडोमबाबत फार अज्ञानी होते असे नाही. या गोष्टी माहिती होत्या. त्या गोष्टीबाबत आपल्याकडे जो एक सोशल स्टिग्मा आहे त्याविषयी मी ऐकुन (Bollywood celebrity) होते. मात्र कालांतरानं त्याबाबत माझा दृष्टीकोन बदलला. कंडोमविषयी मला सर्वात प्रथम शाळेतच माहिती मिळाली.
घरात मला तर माझ्या कुटूंबियांनीच कंडोमविषयी सांगितले. मला तेव्हा ते काय म्हणत आहे ते फारसं कळत नव्हते. पण ते महत्वाचं होतं एवढं मात्र नक्की. घरात आमची त्या गोष्टीवरुन चर्चा व्हायची. त्यानंतर मला त्याबाबत माहिती झाले. माझ्या घरात नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवरुन संवाद व्हायचा. त्यातून प्रबोधन व्हायचे. आता काही प्रश्न असे असायचे की. ते मला पालकांना विचारण्यात काही अर्थ नव्हता. अशावेळी शाळकरी मित्र मैत्रीणी यांच्या संवादातून मला भरपूर माहिती मिळाल्याचे नुसरतनं यावेळी सांगितले. येत्या शुक्रवारी 10 जुनला नुसरताच जनहित में जारी नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.