palak tiwari  Sakal
मनोरंजन

Palak Tiwari: पलक तिवारी सैफचा मुलगा इब्राहिमला करतेय डेट? म्हणाली, प्रेम कधीच विचार...

पलक तिवारी लवकरच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लाडकी पलक तिवारी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. पलक तिवारी लवकरच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.

या चित्रपटाची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. मात्र, याआधी पलक म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. तिचे बिजली बिजली हे गाणे खूप गाजले. या गाण्यात तिच्यासोबत हार्डी संधू दिसला होता.

आगामी चित्रपटाशिवाय पलक तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. श्वेताची लाडकी सैफ अली खान खानचा मोठा मुलगा इब्राहिमसोबत अनेकदा दिसली आहे. दोघेही अनेकदा डिनरवर स्पॉट झाले आहेत.

अनेकवेळा पलक तिवारीही चेहरा लपवताना दिसली आहे. ज्यानंतर लोकांना वाटू लागले आहे की हे दोन्ही स्टार किड्स एकमेकांना डेट करत आहेत. अशा परिस्थितीत पलकने इब्राहिमसोबतच्या तिच्या लिंकअपबद्दल सांगितले आहे.

खरं तर, गेल्या वर्षी पलकला इब्राहिमसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना कॅप्चर केलं होतं. यावेळी दोघेही तोंड लपवताना दिसले. त्यादरम्यान एका मुलाखतीत पलकने सांगितले होते की, ती इब्राहिम आणि तिच्या इतर मित्रांसोबत बाहेर गेली होती. आई श्वेता हिला आपण कुठे जातोय हे न सांगितल्याने तिने आपला चेहरा लपवला होता. आता अलीकडेच पलकला पुन्हा एकदा इब्राहिमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

पलकच्या म्हणण्यानुसार, "ती दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती पूर्णपणे तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे आणि हे वर्ष तिच्यासाठी खूप खास असणार आहे. ती सध्या या अफवांवर बोलू इच्छित नाही. पलकला फक्त कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. पलक पुढे म्हणाली, प्रेमाच कधीच मोजमाप किंवा त्याबद्दल भाकित केलं जावु शकत नाही".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT