actress Pooja Hegde received death threats? actress's team told the truth to media eSakal
मनोरंजन

Pooja Hegde: पूजा हेगडेला मिळाली जीवे मारण्याची धमकी? अभिनेत्रीच्या टीमने सांगितला नेमका प्रकार

पूजाला धमकी मिळाल्याने सर्वांना धक्का बसला. पण आता खरा प्रकार उघडकीस आलाय

Devendra Jadhav

Pooja Hegde Death Threat News Update: बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे सध्या चांगलीच चर्चेत आहे. पूजाला आपण आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे सर्वांना धक्का बसला. आता या सर्व प्रकरणावर अभिनेत्रीच्या टीमने खुलासा केलाय. काय म्हणाली पूजाची टीम बघा.

पूजाला मिळालेली धमकी खरी की खोटी?

पूजाच्या टीमने सांगितले की, "ही फेक न्यूज कोणी सुरू केली हे आम्हाला माहित नाही. ही पूर्णपणे खोटी माहिती आहे." पूजाने अद्याप याबाबत मौन सोडलेले नाही आणि याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. अभिनेत्रीच्या टीमने हे निवेदन दिल्याने पूजाच्या चाहत्यांना दिलासा मिळालाय. (Is the threat received to Pooja true or false?)

पूजाला मिळालेल्या धमकीचे वृत्त

काल विरल भयानीने दिलेल्या वृत्तानुसार, पूजा दुबईला एका क्लबच्या उद्घाटनासाठी गेली होती. पण तिथे तिचा जोरदार वादा झाला. या वादानंतर पूजाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळणं सुरु झालं, असं सांगण्यात आलं.

हा वाद नेमका कशावरुन झाला हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. सध्या पूजाने भारतात परतण्याचा निर्णय घेतलाय. पूजा हेगडेच्या टीमकडून अधिकृत निवेदनाची सर्वांना प्रतीक्षा आहे. ही बातमी ऐकताच पूजाच्या चाहत्यांनी तिच्यासाठी काळजी दर्शवली आहे. (Report of threat received to Pooja)

पूजाचे आगामी सिनेमे

पूजाच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं तर पूजा हेगडे शेवटची सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान'मध्ये दिसली होती. या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर छाप सोडण्यात अपयशी ठरला. पूजा आता आगामी 'देवा' सिनेमात अभिनय करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत शाहिद कपूर झळकणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 11 ऑक्टोबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे.(Pooja's Upcoming Movies)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT