actress prajakta mali jamal kudu dance video viral with family bobby deol animal ranbir kapoor SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: प्राजक्ताला सुद्धा 'जमाल कुडू'चा मोह आवरला नाही, सहकुटुंब केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

प्राजक्ता माळीने लॉर्ड बॉबीच्या जमाल कुडू गाण्यावर डान्स केलाय

Devendra Jadhav

Prajakta Mali Jamal Kudu Dance: प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. प्राजक्ता माळीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सुत्रसंचालन करुन सर्वांच्या मनावर राज्य केलंय. याशिवाय ती विविध सिनेमांंमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते.

प्राजक्ता सोशल मीडियावर तिच्या आयुष्याबद्दलचे विविध अपडेट्स शेअर करत असते. अशातच प्राजक्ताने सध्या गाजत असलेल्या जमाल कुडू गाण्यावर डान्स केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय

प्राजक्ता माळीने केला जमाल कुडूवर डान्स

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात ती तिच्या कुटुंबासोबत मजा करताना दिसतेय. यावेळी प्राजक्ताची आई, तिच्या भाची आणि इतर कुटुंबिय पाहायला मिळतात.

प्राजक्ताने यावेळी तिच्या डोक्यावर स्टीलचा ग्लास ठेवला असून ती जमाल कुडू गाण्यावर खास डान्स स्टेप करतेय. याशिवाय मैं हू डॉन गाण्यावर ती आणि तिचे कुटुंबिय डान्स करताना दिसत आहेत.

प्राजक्ताने केवळ डान्स केला नाही. तर ३१ डिसेंबरला तिच्या फॅमिलीसोबत चुलीवरचं जेवण केलंय. "About 31st December… आमचे बॅाबी देओलs आणि डॉनs…" असं कॅप्शन तिने दिलंय. याशिवाय तिने २०२३ चा लास्ट सेल्फी आणि २०२४ चा पहिला सेल्फीही पोस्ट केलाय. अनेकांना प्राजक्ताचं हे भन्नाट सेलिब्रेशन आवडलं असून ती आणि तिच्या फॅमिलीवर कौतुकाचा वर्षाव केलाय.

प्राजक्ताने ज्या गाण्यावर डान्स केला ते जमाल कुडू गाणं अॅनिमल सिनेमातलं आहे. बॉबी देओलवर चित्रीत झालेलं हे गाणं सध्या अनेक इन्स्टाग्राम्स रील्सचा भाग बनलं आहे.

प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करत आहे. याशिवाय तिने २०२३ मध्ये तीन अडकून सीताराम या कॉमेडी सिनेमात अभिनय केलाय. प्राजक्ताच्या फॅन फॉलोईंगमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT