actress prajakta mali practice to eat gutkha for ranbazar web series sakal
मनोरंजन

गुटखा खायचा सराव करत होती प्राजक्ता माळी.. पाहा नेमकं काय म्हणाली..

अभिनेत्री प्राजक्ता माळीने रानबाजार या वेबसिरिज साठी गुटखा खाण्याचा सराव केल्याचे तिने एका व्हिडिओतून सांगितले आहे.

नीलेश अडसूळ

prajakta mali : मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची रानबाजार या वेबसिरीजची चर्चा अधिक रंगली आहे. वेब सीरिजच्या पहिल्या टीजरपासून यामध्ये बोल्ड दृश्य दाखवण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची विशेष चर्चा रंगली होती. या वेब सिरिज मध्ये प्राजक्ताने एका वेश्येची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तीला प्रचंड मेहनत करावी लागली. प्राजक्ताच्या स्वभावाच्या पूर्णतः विरुद्ध अशी ही भूमिका होती. त्यामुळे तिने या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी अनेक सायास केले आहेत. त्याविषयीच माहिती देणारा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. (actress prajakta mali practice to eat gutkha for ranbazar web series ) (prajakta mali instagram post)

प्राजक्ताने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिनं रानबाजार वेबसिरीजसाठी तिला स्वतःमध्ये काय बदल करावा लागला याची माहिती दिली आहे. मध्यंतरीही एका मुलाखतीत तिने याबाबत सांगितले होते. प्राजक्ताने आजवर कधीही शिव्या दिलेल्या नाहीत पण या भूमिकेसाठी तिला शिव्या देण्याचा सराव करावा लागला. तिने 11 किलो वजन वाढवले. तिच्या भाषेत, देहबोलीत तिला बदल करावे लागले. आज तर तिने एक मोठा खुलासा केला आहे. प्राजक्ता या वेब सिरिज मध्ये सतत गुटखा खाताना दिसते. रेड लाइट भागातील महिलांना असलेले व्यसन दाखवण्यासाठी हे दृश्य आपल्याला दिसतात. या साठी प्राजक्ताला गुटखा कसा खातात याचाही सराव करावा लागला आहे. (ranbazar web series)

प्राजक्ताने वॅनिटी मधील एक व्हिडिओ शेअर करत त्याला कॅपशन दिले आहे की, 'Vanity मध्ये बसून बडीशेप खात मसाला गुटखा वगैरे खातेय असं भासवण्याची practice..' याचाच अर्थ कि अभिनयात जिवंत पणा आणण्यासाठी प्राजक्ता सतत बडीशेप खाऊन गुटखाज खात असल्याचे भासवत होती. याच तिच्या परिश्रमाचे फळ तिच्या अभिनयात दिसून आले आहे. म्हणून पुढे ती म्हणते.. 'ह्या दिवशी पहिल्यांदा make up केला होता… सुंदर दिसण्यासाठी नाही अर्थात..' आणि पुढे म्हणते, 'रानबाजार' चे सर्व भाग प्रदर्शित झाले आहे, तेव्हा नक्की बघा.. '

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT