actress priya berde said why she left NCP and join BJP in pune tamasha conference sakal
मनोरंजन

Priya Berde: मला तिथे.. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप मध्ये का आल्या प्रिया बेर्डे? पाहिल्यांदाच सांगितलं कारण..

प्रिय बेर्डे यांच्या विधानाने वेधलं लक्ष..

नीलेश अडसूळ

Priya Berde : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि प्रख्यात अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या भाजप प्रवेशाची बरीच चर्चा झाली. पण त्यांनी राष्ट्रवादी का सोडलं, याचं कारण मात्र अद्याप समोर आलं नव्हतं.. अखेर पुणे येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत प्रिया यांनी याबाबत स्पष्टोक्ती दिली.

(actress priya berde said why she left NCP and join BJP in pune tamasha conference)

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम का केला याचं कारण सांगितलं. त्या म्हणाल्या, ''राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना खूपच मर्यादा होत्या. अनेक मर्यादा माझ्यावर तेव्हा होत्या. भाजपात मला काम करण्याचा स्पेस मिळाला. मी त्याच कारणाने भाजपात आले.''

''आत्तापर्यंत सांस्कृतिक विभाग नेहमीच दुर्लक्षित होता. या विभागाला फक्त प्रचारापुरतंच गृहित धरलं जायचं. मात्र आता असं होणार नाही प्रत्येक कलाकाराला न्याय मिळेल.'' असं प्रिया बेर्डे यावेळी म्हणाल्या.

यावेळी तमाशा कलावंतांच्या व्यथा जाणून घेताना त्यांचे डोळे पाणावले. येत्या काळात काही ठोस उपाययोजना होतील असे आश्वासनही यांनी कलाकारांना दिले. तसेच गौतमी पाटील प्रकरणावरही त्या बोलल्या.

प्रिया बेर्डे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर घड्याळ बांधलं होतं. परंतु, अवघ्या दोनच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला निरोप देत 'भाजप' मध्ये प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT