actress radhika apte had fabulous party at first menstrual cycle period know this unique story related to actress  
मनोरंजन

पिरियड्स सुरु होताच, घरात केली मोठी पार्टी; राधिकाचा भन्नाट किस्सा

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  बॉलीवूड मधील काही अभिनेत्यांचे एकदम भन्नाट किस्से आहेत. त्यामुळे त्यांच्या फॅन फॉलोअर्समध्ये आणखी वाढ झाली आहे. राधिका आपटे तिच्या हटकेपणाबद्दल प्रसिध्द आहे. संवेदनशील अभिनेत्री म्हणून तिची वेगळी ओळख आहे. तसेच ठाम भूमिका घेणे यासाठीही ती परिचित आहे. आपण घेतलेल्या भूमिकेबद्दल आपल्यावर कितीही टीका झाली तरी कुठलीही चिंता करायची नाही अशी राधिकाची ओळख आहे. त्यामुळे तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी राधिका आपल्याविषयीचे अनेक किस्से शेअर करत असते. ते किस्से कमालीचे भन्नाट तर काही वेळा कमालीचे चक्रावून टाकणारे असतात. असाच एक किस्सा तिनं सांगितला आहे. त्यामुळे तिच्यातील वेगळेपण त्यानिमित्तानं समोर आलं आहे.

राधिकाच्या पिरियड्सचा पहिला दिवस होता. त्यावेळी झालेल्या एका किश्श्याची आठवण राधिकानं करुन दिली आहे. राधिकाला पहिल्यांदा पिरियड्स सुरु झाले तेव्हा तिच्या घरी कशाप्रकारचे वातावरण होते याबद्दल तिनं सांगितलं आहे. त्या दिवसाच्या निमित्तानं राधिकाच्या घरी पार्टींचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्याकडे अजूनही ज्या गोष्टीबद्दल बोलायला काही अंशी दडपण असते ती म्हणजे महिलांचे पिरियड्स. समाजात त्याबद्दल अनेक समज - गैरसमज आहेत. त्याविषयी काही बोलायचं झाल्यास अनेकजण वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. मागच्या वर्षीच्या ऑस्करमध्ये या विषयावर तयार करण्यात आलेल्या एका माहितीपटाला ऑस्कर मिळालं होतं. मासिक पाळीसारखा एक महत्वाचा विषय त्या माहितीपटामध्ये हाताळण्यात आला होता.

राधिकानं जेव्हा आपल्या मासिक पाळीबद्दलचा विषय सोशल मीडियावर शेअर केला त्यावेळी अनेकांना धक्का बसला आहे. काहींनी तिच्या बोल्डपणाचं कौतूकही केलं आहे. त्या वक्तव्यामुळे राधिका चर्चेत आली होती. राधिकानं सांगितलं की, जेव्हा मला पहिल्यांदाच पिरियड्स आले त्यावेळी माझ्या घरातील वातावरण कसे होते, याबद्दल राधिकानं सांगितलं आहे. राधिकाचा हा किस्सा 2018 च्या वेळचा आहे. त्यावेळी अक्षय कुमारचा पॅडमॅन नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं एक किस्सा सांगितला होता.

राधिकानं ज्यावेळी तो किस्सा सांगितला त्यावेळी अनेकांना धक्का बसला होता. राधिकानं सांगितलं, माझ्या घरी सगळे डॉक्टर आहेत. त्यामुळे घरात कधी रुढी, परंपरावादी गोष्टी होत नाहीत. मला तर अनेकदा माझ्या वैयक्तिक गोष्टीबद्दल सांगायचे. मला ज्यावेळी माझ्या पिरियड्स बद्दल सांगण्यात आले तेव्हा मला रडू कोसळले होते. राधिकानं सांगितले होते की, मी माझ्या अशाप्रकारच्या बदलामुळे घाबरुन गेले होते. मात्र माझ्या घरच्यांनी खास पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी माझ्या जवळचे अनेकजण आले होते. त्यांनी माझ्यासाठी वेगवेगळे गिफ्टस्  आणले होते. मला गिफ्ट म्हणून घड्याळ मिळाले होते. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Latest Marathi News Live Update : गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार- चंद्रशेखर बावनकुळे

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT