Rajshree Kharat esakal
मनोरंजन

फँड्रीतल्या 'शालू'ला थेट बॉलिवूडचं तिकीट; राजश्री झळकणार 'या' चित्रपटात

अरुण सुर्वे

अभिनेत्री राजश्री खरातला बॉलिवूडचं तिकीट मिळालं आहे.

पुणे : ‘फँड्री’ (Fandry Movie) या बहुचर्चित चित्रपटातून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री राजश्री खरातला (Actress Rajshree Kharat) बॉलिवूडचं तिकीट मिळालं आहे. 'पुणे टू गोवा' चित्रपटातून (Pune to Goa Movie ) राजश्री बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करत असून या अगोदर राजश्रीनं फँड्री, आयटमगिरी अशा मराठी चित्रपटातून अभिनय केला होता.

अमोल भगत (Amol Bhagat) दिग्दर्शित 'पुणे टू गोवा' या चित्रपटात राजश्री दिसणार आहे. याचबरोबर आदित्यराजे मराठे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या हिंदी चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन (Adityaraje Marathe Production) आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस (Moraya Production House) यांनी केली असून हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर आणि ॲक्शन रसिकांना पाहता येणार आहे.

हा चित्रपट वास्तविक आयुष्यात संघर्ष करणार्‍या कलाकारांच्या पुणे ते गोव्याच्या प्रवासावर आधारित आहे; पण या कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणार्‍या धोकादायक परिस्थितींवर प्रकाश टाकण्यात आला आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT