actress rakhi Sawant childhood pics she shares on Instagram with this note 
मनोरंजन

लहानपणी काय गोड दिसायची गं; ओळखलं का हिला, आता भलतीच 'हॉट'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूड असो वा हॉलीवूड, टॉलीवूड असो द्यात किंवा मॉलीवूड यातील सेलिब्रेटींना आपले फोटो शेअर करुन प्रसिध्दी मिळवण्याचा एक सोस असल्याचे दिसून येते. त्यात लहान मोठ्या सर्वच सेलिब्रेटींचा समावेश आहे. काही करुन आपण चर्चेत कशाप्रकारे राहु असा विचार ते करताना दिसतात. कोरोनामुळे आता मनोरंजन क्षेत्रावर आर्थिक संकट कोसळले असताना त्याचा परिणाम बॉलीवूडवरही झाला आहे.कित्येकांना काम नाही. परंतु अशावेळी चाहत्यांच्या मनातून आपली छबी झाकोळली जाऊ नये याची काळजी काही सेलिब्रेटी जाणीवपूर्वक घेत असल्याचे दिसून आले आहे.

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री राखीची एक फोटो पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या माध्यमातून राखीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यंदाचा बिग बॉसचा सीझन राखीनं गाजवला असे म्हणता येईल. तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या करामतीनं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यामुळे काही काळ तिच्याक़डे संभाव्य विजेता म्हणूनही पाहिलं गेलं होतं. मात्र यशानं तिला हुलकावणी दिली. आणि तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर राखीनं आपल्या आईला कॅन्सर झाला असून त्याच्या उपचारासाठी बिग बॉसमधून मिळालेले पैसे खर्च करणार असल्याचे सांगितले होते.

राखीनं लहानपणीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिचे लहानपणीचे फोटो सुंदर आहेत. बॉलीवूडमध्ये राखी तिच्या सडेतोड आणि परखड स्वभावाबद्दल प्रसिध्द आहेत. त्याविषयी तिचे काही किस्सेही ऐकीवात आहेत. तिच्या फॅन्सला राखीचे फोटो कमालीचे आवडले आहेत. आपल्या लहानपणीचा प्रवास राखीनं शेअर केला आहे. तो तिच्या चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. राखीला बॉलीवूडमध्ये 24 वर्षे पूर्ण झाली. तिनं दोन दशकांहून अधिक काळ तिनं आपली ओळख निर्माण केली आहे.

अनेकदा राखीला वेगवेगळ्या कारणासाठी टीका सहन करावी लागली आहे. तिला ट्रोलही केले गेले आहे. आपल्या परखड प्रतिक्रियेमुळेही नेटक-यांनी राखीला धारेवर धरले आहे. मात्र यासगळ्याचा राखीवर काही एक परिणाम झालेला नाही. ती जशी आहे तशीच राहिली आहे. राखीला आपल्या स्वभावाचा अभिमान आहे. आताही तिनं जे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यात ते फोटोंविषयी चाहत्यांना काय वाटते असे चाहत्यांना सुचवले आहे. 

कॅप्शनमध्ये राखीनं म्हटलं आहे की, लहानपणापासून ते आतापर्यत एक मोठा प्रवास मी केला आहे. त्या प्रवासाविषयी मला खूप आनंद वाटतो. त्याचे मनस्वी समाधानही आहे. मी माझ्या आयुष्यात खुप चढउतार पाहिले आहे. माझ्या लहानपणीच्या फोटोंना तुम्ही एक चांगली कॅप्शन द्या अशी विनंती राखीनं चाहत्यांना केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये पुन्हा बिबट्या दिसला

Pune Traffic Update : शिवणे- नांदेड पूल रस्ता शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम!

SCROLL FOR NEXT