rakhi sawant  Sakal
मनोरंजन

Rakhi Sawant: राखीला पडली सलमानच्या गाण्याची भुरळ, मात्र करायला गेली काही अन् झाल काही...लुंगी डान्सचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी राखी सावंतचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

Aishwarya Musale

राखी सावंत जितकी बोल्ड आहे तितकीच ती बिनधास्त आहे. कधी तिच्या काही वक्तव्यांमुळे तर कधी तिच्या काही कामांमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेक वापरकर्ते तिला खूप पसंत करतात आणि बरेच जण तिला ड्रामा क्वीन म्हणतात. सध्या ती तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लुंगी डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ विरल भयानीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तिने जीन्सवर लुंगी स्टाइलमध्ये पांढऱ्या रंगाचे कापड बांधले आहे.

बॅकग्राउंडमध्ये गाणे वाजत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर राखी त्या गाण्यावर नाचत आहे. मधेच ती स्वतःच्या स्टाईलमध्ये गाणंही गुणगुणत आहे. आता तिचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. लोक ते पाहत आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

राखी सावंतचा हा व्हिडीओ अनेकांना आवडत आहे. तसेच अनेक जण तिला ट्रोल करत आहेत. कमेंट करताना, एका वापरकर्त्याने विचारले की तणाव आणि चिंता कुठे गेली. दुसऱ्या युजरने लिहिले की, "हिचा बुरखा कुठे गेला?" तर दुसऱ्या युजरने "रमजानचे काय झाले, रोजा सोडला का?"

विशेष म्हणजे आदिल खानसोबत लग्न केल्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारल्याचे सांगितले होते. ती अनेकदा हिजाब परिधान करताना दिसली होती. यासोबतच तिने रोजा ठेवला. ती इफ्तार करतानाही दिसली. त्याचवेळी ती लुंगी डान्स करताना दिसली होती, त्यानंतर लोक तिच्या रोजाबद्दल प्रश्न विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गोळीबारावरून सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांनी शहराचे पालकत्व घ्यावे!

Space Mission: भारताने इतिहास घडविल्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर अवकाशात

ट्रम्प यांचा भारताला पुन्हा दणका? २५ टक्के टॅरिफ लावण्याच्या हालचाली; आणखी ६ देश रडारवर

SCROLL FOR NEXT