rashmika mandanna
rashmika mandanna  
मनोरंजन

HBD रश्मिका : नॅशनल क्रश, स्ट्रगल, ब्रेकअप आणि बरंच काही..

सकाळ ऑनलाइन

प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. दाक्षिणात्य चित्रपटात काम करणारी ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिकाचा आज २५ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिचे चित्रपटसृष्टीतील यश सर्वांना माहित आहे. पण तिच्या यशामागील संघर्ष फारसं कोणाला माहित नाही. रश्मिकाचा जन्म कर्नाटकामधील विराजपेटमध्ये झाला. ती लहानपणापासूनच हुशार होती. तिने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यामध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे. रश्मिका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. तिने कॉलेजमध्ये असल्यापासून मॉडेलिंग करण्याची सुरूवात केली. 

स्ट्रगलिंगच्या काळात रश्मिकाने २०१५ साली एका टॅलेंट हंटमध्ये भाग घेतला आणि ती स्पर्धा तिने जिंकली. हा टॅलेंट हंट तिच्यासाठी आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. प्रसिध्द दिग्दर्शक रिषभ शेट्टी यांनी रश्मिकाला पाहिलं आणि तिला किरिक पार्टी या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यावेळी रश्मिका १९ वर्षांची होती. कमी वयात रश्मिकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  किरिक पार्टी हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता रक्षित शेट्टीसोबत तिची मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. २०१७ साली रश्मिकाने रक्षितसोबत साखरपुडासुद्धा  केला होता. पण २०१८ मध्ये त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली. 

रश्मिका लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुड बाय' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू'मध्ये देखील भूमिका साकारणार आहे. रश्मिका सध्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटासाठीही काम करत आहे. तिच्या क्युटनेसमुळे आणि हावभावांमुळे ती नॅशनल क्रश झाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT