Rashmika Mandanna  Sakal
मनोरंजन

Rashmika Mandanna Birthday: रश्मिकाचे पाच शहरात घरं? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं होतं खरं काय ते...

श्रीवल्ली फेम रश्मिकाचा आज जन्मदिवस. या अभिनेत्रीनं आता केवळ टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडमध्ये देखील स्वताची वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले आहे.

Aishwarya Musale

टॉलीवूडचा पुष्पा प्रदर्शित झाला त्यातील श्रीवल्लीनं प्रेक्षकांवर आपली वेगळी छाप उमटवली होती. श्रीवल्ली फेम रश्मिकाचा आज जन्मदिवस. या अभिनेत्रीनं आता केवळ टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडमध्ये देखील स्वताची वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले आहे. रश्मिकाची ओळख ही आता नॅशनल क्रश झाली आहे.

रश्मिका नेहमी तिच्या स्टाईल आणि विनोदबुद्धीमुळे चर्चेत असते. तिच्या सौंदर्याचे अनेक दिवाने आहेत. या दाक्षिणात्य सौंदर्याने बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवले आहे. तिचे चित्रपट, वैयक्तिक आयुष्य इत्यादींबद्दल तुम्हाला माहिती असेलच. पण तुम्ही तिच्या आलिशान घराची झलक पाहिली आहे का? आज तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्या आलिशान घराची झलक देत आहोत.

खरं तर, तिच्या लॅविश होम्सबद्दल बोलायचं झालं तर, यात अभिनेत्रीशी क्वचितच कोणी स्पर्धा करू शकेल. ज्या शहरांमध्ये तिची घरे आहेत त्यामध्ये मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कुर्ग आणि गोवा या शहरांचा समावेश असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, काही काळापूर्वी हे वृत्त खुद्द रश्मिकाने फेटाळले होते.

एका पोस्टवर कमेंट करताना रश्मिकाने तिच्याकडे पाच घरे असल्याचा दावा फेटाळून लावला. तिने लिहिले होते की, 'हे खरे असते तर चांगले झाले असते'. मात्र, रश्मिकाला नेहमीच लग्जूरियस लाइफस्टाइलची आवड आहे. पण, पाच शहरांमध्ये आलिशान घर असणं हे तिचं स्वप्न आहे. अभिनेत्रीच्या या उत्तराने एका झटक्यात स्पष्ट केले की सोशल मीडियावर तिच्याबद्दल किती अफवा सुरू आहेत.

रश्मिकाच्या स्वप्नांना पाच नाही तर 2 घरे नक्कीच आहेत. अलीकडे, पुष्पा अभिनेत्रीने तिच्या गोव्यातील घराचे सुंदर फोटो देखील शेअर केले आहेत. यासोबतच एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. तुम्ही इन्स्टाग्रामवर रश्मिकाच्या लक्झरी लाइफस्टाइलचा सहज आढावा घेऊ शकता. ती अनेकदा तिच्या घरातील सुंदर फोटो शेअर करत असते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रश्मिका शेवटची सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू या चित्रपटात दिसली होती. आता ती तिच्या पुढच्या अॅनिमल या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. बातमीनुसार, हा चित्रपट यावर्षी 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात रवा पिझ्झा बॉल ट्राय केले का? लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT