actress rinku rajguru visited jyotiba temple kolhapur video viral sakal
मनोरंजन

Rinku Rajguru Video: चांगभलं! म्हणत आर्चीनं घेतलं ज्योतिबाचं दर्शन.. व्हिडिओ व्हायरल..

अभिनेत्री रिंकू राजगुरूनं कोल्हापूरला जाऊन ज्योतिबाला घातलं साकडं..

नीलेश अडसूळ

Rinku Rajguru in jyotiba temple kolhapu: मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं (rinku rajguru) नाव घेता येईल.

प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (sairat) या चित्रपटामध्ये रिंकुनं भूमिका केली होती. तिचा तो पहिला चित्रपट. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे.

वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुनं दमदारपणे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. झुंड, आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटांतूनही रिंकूने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. नुकतीच दख्खनचा राजा ज्योतिबाला गेली होती. इथला देवदर्शनाचा व्हिडिओ रिंकुनं शेयर केला आहे.

(actress rinku rajguru visited jyotiba temple kolhapur video viral)

नुकतचं रिंकून कोल्हापूर येथे जाऊन ज्योतिबाचं दर्शन घेतलं. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घेत रिंकूनं (rinku rajguru) देवाकडं साकडं घातलं.

तिनं हा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. यामध्ये रिंकूची आई, आजी देखील दिसत आहे. कुटुंबासोबत रिंकूने काही कुळाचार, विधी देखील पार पाडले. यावेळी मंदिरात रिंकूचे जोरदार स्वागत झाले. मंदिर प्रशासनाने तिचा आदर सत्कार केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यावेळी रिंकू गुलालत नाहून गेल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे ती कोणत्याही मेकपविना अत्यंत सध्या पोषाखात देवदर्शनाला गेली गेली होती. त्यामुळे तिचा हा साधेपणा चाहत्यांना प्रचंड भावला आहे.

तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत तीचं कौतुक केलं आहे. तसंच कोल्हापूरकर चाहत्यांनी तीचं कोल्हापूरमध्ये स्वागत असं म्हंटलं आहे. तसेच सर्वांनी तिला आगामी प्रोजक्टसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Card : रेशनकार्डमधून १.१७ कोटी लोकांची नावे वगळणार, केंद्राने राज्यांना पाठवली यादी; तुमचं नाव तर नाही ना ?

Pune Traffic : सिंहगड रस्तावासीयांना पुन्हा मनस्ताप; पाऊस, प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाहतूक कोंडी

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT