Actress rutuja bagwe angry reaction on who trolled her for latest hot photos in red gown  sakal
मनोरंजन

Rutuja Bagwe: मल्लिका शेरावत व्हायचय का? चाहत्याची कमेंट अन ऋतुजानं दिलं सणसणीत उत्तर..

नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली ऋतुजा..

नीलेश अडसूळ

Rutuja Bagwe: अनेक लोकप्रिय मालिका आणि नाटक सिनेमांतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. मराठी मनोरंजन विश्वातील ऋतुजा एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या 'अनन्या' नाटकाने तर प्रेक्षकांना वेड लावलं होतं.

ऋतुजा बागवे आपल्या चाहत्यांशी चांगलीच संपर्कात असते. त्यासाठी सोशल मीडियावर तिचा वावर बराच सक्रिय असतो. तिचा योगा, डान्स, रिल्स याच्या अनेक व्हडिओ ती रोज पोस्ट करत असते. गेल्या काही दिवसात तिने शेअर केलेल्या हॉट फोटोंचीही बरीच चर्चा होती. पण आता त्याच फोटोंवरुन तिला ट्रोल केल्याने ती चांगलीच भडकली आहे.

(Actress rutuja bagwe angry reaction on who trolled her for latest hot photos in red gown )

काही दिवसांपूर्वी ऋतुजानं लाल रंगाचा सुंदर गाऊन परिधान एक खास फोटोशूट केलं आणि हे फोटो तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेयर केले. या फोटोंमध्ये ती अत्यंत देखणी दिसत असल्याने चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला. ती किती सुंदर आहे, ग्लॅमरस आहे, मोहक आहे अशा कमेंट चाहत्यांनी दिला. पण एका नेटकऱ्याने मात्र या फोटोवर नकारात्मक कमेंट केली.

“नक्की मल्लिका शेरावत बनायची इच्छा आहे वाटतं.” अशी कमेंट एका नेटकाऱ्याने केली आहे. ही कमेंट पाहताच ऋतुजाच्या एका चाहत्याने त्याला उत्तर देत लिहिलं आहे की, “सॉरी पण तुम्ही कपड्यांवरून जज कसे काय करू शकता? आणि मल्लिका शेरावत होण्यासारखा नाही हा आउटफिट.”

Actress rutuja bagwe angry reaction on who trolled her for latest hot photos in red gown

यावर ऋतुजानेही सडेतोड उत्तर देत त्या नेटकऱ्याला सुनावले आहे. “थँक यू आणि सरड्याची धाव कुंपणापर्यंत… त्यांनी फक्त तिचे चित्रपट पाहिले असतील किंवा त्यांची आवडती असेल म्हणून तीच आठवली असेल पटकन. सरड्याची धाव कुंपणापर्यंत… आपण लक्ष नाही द्यायचं.” असं ऋतुजा म्हणाली आहे. त्यामुळे तिचे हे फोटोज आता चर्चेचा विषय झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT