actress sai tamhankar shared hot photos with white outfit for elle beauty awards
actress sai tamhankar shared hot photos with white outfit for elle beauty awards sakal
मनोरंजन

Sai Tamhankar: कंदील, लंगोट, झालर, उर्फी.. त्या फोटोने सई होतेय तुफान ट्रोल..

नीलेश अडसूळ

sai tamhankar: sai tamhankar : सई ताम्हणकर हे नाव आता मराठी पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. सईने या आधीही बॉलीवुड मध्ये आपली जादू दाखवली आहे. आता तर तिने हिन्दी चित्रपटांचा धडाकाच लावला आहे. लवकरच ती इम्रान हाशमी सोबत ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात झळकणार आहे. तर सध्या तिच्या 'इंडिया लॉकडाउन'या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. सईचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. पण त्याच चाहत्यांनी आज तिला चांगलेच ट्रोल केले आहे. सईने केलेल्या विचित्र फॅशनमुळे टी ट्रोल झाली आहे.

दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर काल रात्री मुंबईत 'ELLE' ब्युटी अवॉर्ड्स 2022 पार पडले. यादरम्यान बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. सई देखील सोहळ्यात उपस्थित होती. यावेळी सईच्या कपड्यांची प्रशंसा झाली खरी पण नेटकऱ्यांना आणि तिच्या चाहत्यांना मात्र तिची ड्रेसिंग स्टाइल आवडलेली नाही. तिच्या या अजब फॅशनमुळे तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे.

सईने यावेळी ग्रे, पिवळा आणि पांढरा अशा विविध रंगांचा वापर केलेला लाँग गॉऊन टाईप ड्रेस घातला होता. हा ड्रेस जणू चुरगळलेले कपडे एकत्र करून त्याला गाठी मारून तयार केला आहे असा दिसत होता.सई या लुकमध्ये अत्यंत बोल्ड दिसत होती पण तिची ही ड्रेसिंग स्टाइल तिला चांगलीच महागात पडली आहे. तिने या लुक मधील काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. त्यावर आलेल्या नेटकऱ्यांच्या कमेंट वाचून हसण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, 'सई.. हा दिवाळीचा रस्त्यावरचा कंदील आहे की काय?" तर एकाने लिहिले आहे, "सईने लग्नाच्या मंडपातील कापड तर नाही लावले ना? " एक म्हणतो.. ''हे असेच ठेव पुढच्या वर्षी दिवाळीला उपयोगी येईल ग.." तर एकाने तर तिच्या ड्रेसला आजोबांचा लंगोट म्हंटलं आहे.

काहींनी तिला विचित्र फॅशन करणाऱ्या उर्फीची उपमा दिली आहे. ''तुला उर्फी चावली का", ''ही तर चौकटची राणी", ''ही तर दुसरी उर्फी'' अशा कमेंट तिच्या फोटोवर आल्या आहेत. एकाने तर सरळ लिहिले आहे की, " सई जर तू असे फाटलेले कपडे घातले तर तुला मी बॉयकॉट करणार''.. तर एक म्हणतो, ''ही मंडपाची झालर गुंडाळून आली आहे''. तिच्या या फोटोंनी सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT