actress saiee manjrekars film major first look out and viral teaser on april 
मनोरंजन

'मेजर' मध्ये सई मांजरेकरचा 'क्युट लूक'; फॅन्सकडून कौतूकाचा वर्षाव 

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड आणि मराठीतील प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांची सई मांजरेकरनं यापूर्वीच बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आता तिचा मेजर या चित्रपटातील एक क्युट लूक व्हायरल झाला आहे. तो तिच्या चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. येत्या काही दिवसांत मेजर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सईच्या लूकमुळे त्या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. सईचा सोशल मीडियावर असणारा फॅन्स मोठा आहे. सध्या सईच्या नवीन चित्रपटातील लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे ती लाईमलाईटमध्ये आली आहे.  दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. त्याचा टीझर आता सोशल मीडियावर प्रसिध्द झाला असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

सईच्या लूकलाही फॅन्सनं चांगला रिस्पॉन्स दिला आहे. तिच्या त्या लूकमधील साधेपणा सर्वांच्या कौतूकाचा विषय आहे. सई त्या फोटोमध्ये एका स्टूडंडच्या भूमिकेत दिसते आहे. त्यावेळी ती अदिवी शेषच्या बाजूला बसली आहे. सई मांजरेकर मोठ्या प्रेमानं अदिवीला न्याहाळत आहे. तो फोटो सर्वांना आवडला आहे. त्या फोटोंमध्ये सईचे एक्सप्रेशन्स लक्ष वेधून घेणारे आहेत. ते असे सांगत आहेत की तिला मेजर संदीप आणि इशा यांच्यातील नातं आणखी दृढ करायचं आहे. इशानं संदिपचं नाव लिहिलं आहे. त्यातून त्यांच्या अमर प्रेमाची गोष्ट समोर आली आहे.

पोस्ट कार्डवर तो फोटो छापण्यात आला आहे. या चित्रपटात 16 ते 28 वर्षाच्या मुलीची भूमिका केली आहे. मेजर हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी सईनं तेलुगूही शिकून घेतलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी सईनं व्हाईस ओव्हर आर्टिस्टची मदत घेतलेली नाही. तिनं स्वत सगळं काही केलं आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना तिची मेहनत आवडली आहे. ते तिच्या मेहनतीवर खुश आहेत.

या चित्रपटामध्ये अदिवी शेष हा शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 12 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तर 2 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सोभिता धूलिपाला, सई मांजरेकर, प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत. शशी किरण टिक्का यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT