Saira Bano Meets PM Modi: 
मनोरंजन

Saira Bano Meets PM Modi: दिग्गज अभिनेत्री सायरा बानोंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट! काय घडलं भेटीत?

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सायरा बानो यांनी मोदींसोबत चर्चाही केली.

Vaishali Patil

Saira Bano Meets PM Modi: दिवंगत प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो या 1960 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होत्या. मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय कलाकारांमध्ये त्यांच्या नावाचा सामावेश आहे. 1961 मध्‍ये कल्‍ट क्‍लासिक 'जंगली'मधून सायरा बानो यांनी करिअरची सुरूवात केली. त्यानंतर अल्पावधित त्या यशाच्या शिखरावर पोहचल्या.

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सायरा बानो यांनी मोदींसोबत चर्चाही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. यासोबत त्यांनी या भेटीबद्दलही सांगितलं आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्टमध्ये शेयर करत लिहिले की, "सायरा बानो जी यांना भेटून खूप आनंद झाला. चित्रपटसृष्टीत त्यांच्या उत्कृष्ट कामाचे पिढ्यानपिढ्या कौतुक होत आहे. विविध विषयांवर आमची छान चर्चा झाली. सध्या हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सायरा बानो यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्या 1960 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होत्या. 'पडोसन', 'शादी', 'बैराग', 'जमीर', 'गोपी', 'आयी मिलन की बेला', 'दुनिया', 'हेरा फेरी', 'झुक गया आसमान', 'शादी'पासून 'जंगल' यांसारख्या अनेक हिट चित्रपटात बानो यांनी काम केले.

तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांची मनोरंजन विश्वात चर्चा आहे. त्यांनी लिहीलेल्या 'अबंडन्स इन मिलेट्स' या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 च्या सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. शुक्रवारी आलेल्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 च्या यादीत 'अबंडन्स इन मिलेट्स'ला नामांकन मिळाल्याची आनंदाची बातमी सर्वांना मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात रवा पिझ्झा बॉल ट्राय केले का? लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT