Samantha Tattoo Sakal
मनोरंजन

Samantha Tattoo: सामंथाने अजूनही काढला नाही नागा चैतन्यच्या नावाचा टॅटू, कंबरेवर दिसतोय...

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू नुकतीच लंडनमध्ये तिच्या आगामी सिटाडेल सीरिजच्या एका कार्यक्रमासाठी गेली होती.

Aishwarya Musale

लंडनमधील 'सिटाडेल' प्रीमियरमधील सामंथाच्या फोटोंनी इंटरनेटवर आग लावली आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ही अभिनेत्री परीसारखी दिसत आहे. सामंथा चित्रपटाच्या फंक्शनमध्ये व्यस्त होती परंतु चाहत्यांनी असे काही पाहिले आहे की जे आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लोकांच्या लक्षात आले की सामंथाने अद्याप पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यशी संबंधित जुना टॅटू रिमूव्ह केला नाही. अभिनेत्रीने तिच्या पोटाच्या उजव्या बाजूला कमरेच्या वर 'चाय' नावाचा टॅटू काढला आहे.

सामंथाने पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यसाठी पोटाच्या उजव्या बाजूला 'चाय' हे टॅटू काढले होते. या इव्हेंटमधील अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या काही फोटोंनी या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे की वेगळे झाल्यानंतरही तिने नागा चैतन्यचा टॅटू रिमूव्ह केला नाही. अजून एक गोष्ट म्हणजे, अभिनेत्रीकडे आणखी एक टॅटू आहे, जो नागा चैतन्यसोबतचा तिचा पहिला चित्रपट 'ये माया चेसावे' ला समर्पित आहे. तिने मानेवर 'वायएमसी' टॅटू काढला आहे. हा चित्रपट त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात होती.

काही महिन्यांपूर्वी, जेव्हा सामंथाने इंस्टाग्रामवर 'आस्क मी एनीथिंग' सेशन केले तेव्हा एका चाहत्याने तिला टॅटूबद्दल विचारले. त्याऐवजी, तिने एक सल्ला दिला आणि सांगितले की एखाद्या व्यक्तीच्या नावाचा टॅटू अजिबात काढू नये. तिने चाहत्यांना उत्तर दिले की, 'तुम्हाला माहित आहे की एखाद्या व्यक्तीच्या नावाचा टॅटू कधीच काढू नये. कधीच नाही.'

दरम्यान, सामंथा सध्या वरुण धवनसोबत 'सिटाडेल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मुख्य सिरीजमध्ये रिचर्ड मॅडेन आणि प्रियांका चोप्रा जोनास आहेत. तिने टीमसोबत लंडनमध्ये प्रीमियरला हजेरी लावली आणि खूप मजा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

Khashaba Teaser: 'सैराट'नंतर पुन्हा इतिहास रचणार? नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित, मातीचा खेळ पहायला मिळणार

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

SCROLL FOR NEXT