samruddhi kelkar new serial after phulala sugandh maticha, anuksh chaudhri SAKAL
मनोरंजन

Samruddhi Kelkar: कीर्तीचं मालिकाविश्वात दमदार कमबॅक, आता दिसणार या भूमिकेत

स्टार प्रवाहवरील आगामी मलिकेतून समृद्धी झळकणार आहे.

Devendra Jadhav

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतल्या कीर्तीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. फुलाला सुगंध मातीचा मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेत कीर्तीची भूमिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर दिसली. कीर्ती म्हणजेच समृद्धीच्या फॅन्ससाठी खुशखबर. समृद्धी आता लवकरच मालिका विश्वात दमदार कमबॅक करत आहे.

(samruddhi kelkar new serial after phulala sugandh maticha)

स्टार प्रवाहवरील आगामी मलिकेतून समृद्धी झळकणार आहे. 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा' हा आगामी शो स्टार प्रवाह वर लवकरच सुरु होणार आहे. या शो चा प्रोमो नुकताच बाहेर आलाय. या प्रोमोत समृद्धी दिसत आहे. याशिवाय सुपरस्टार अंकुश चौधरी या शो चा महत्वाचा भाग असणार आहे. हा एक डान्स रिऍलिटी शो आहे. समृद्धी या शो चं सूत्रसंचालन करणार आहे.

समृद्धी या शो निमित्ताने पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुश चौधरी या शोचा परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. 'मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा' या शो चा पहिला सिझन टेलीव्हीजन वर हिट झालेला. या शो निमित्ताने अंकुश चौधरीने अनेक वर्षांनी टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलेलं. या शोच्या नवीन सीझनमध्ये समृद्धी केळकर या शो चा महत्वाचा भाग झाली आहे.

समृद्धीने फुलाला सुगंध मातीचा मालिकेत कीर्तीची महत्वपूर्ण भूमिका साकारली. एका सामान्य मुलीचा IPS ऑफिसर होण्याचा प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला. समृद्धीने या मालिकेसाठी खूप मेहनत घेतली होती. खासकरून जेव्हा मालिकेत कीर्तीचा IPS ऑफिसर होण्याचा प्रवास दाखावण्यात आलाय, त्या ट्रॅकवेळी समृद्धीने विशेष पोलीस ट्रेंनिंग घेतलेली. याशिवाय तिने तिच्या फिटनेसवर जास्त मेहनत घेतलेली.

फुलाला सुगंध मालिकेत समृद्धी सोबत अभिनेता हर्षद अतकरी शुभमच्या भूमिकेत झळकला होता. या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. समृद्धीने साकारलेली कीर्ती महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली. आता समृद्धीला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत तिचे फॅन्स उत्सुक आहेत. १८ फेब्रुवारी पासून शनिवार - रविवार रात्री ९ वाजता हा शो स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT