Sara Ali Khan on sushant singh rajput esakal
मनोरंजन

Sara Ali Khan Video : सुशांत सिंगच्या जन्मदिनानिमित्त साराचा अनोखा उपक्रम

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा आज जन्मदिन. त्यानिमित्त अभिनेत्री सारा अली खान हिने एनजीओतल्या मुलांसोबत अनोखं सेलिब्रेशन केलं आणि सोशल मीडियावर एक नोट लिहिली.

सुशांत सिंग राजपूतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला होता. त्याच्या जन्मदिनानिमित्त सोशल मीडियामध्ये फॅन्स मेसेज शेअर करत आहेत. जरी सुशांत या जगात नसला तरी तो लोकांच्या मनात असल्याचं दिसून आलं.

सुशांतसोबत काम केलेली अभिनेत्री सारा अली खान हिने सुशांतच्या जन्मदिनानिमित्त एनजीओतल्या मुलांसोबत सेलिब्रेशन केलं. हा व्हीडिओ साराने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये मुलं बर्थडे साँग गात आहेत.

साराने सुशांतसाठी एक पोस्टही लिहिली आहे. 'हॅपी बर्थडे सुशांत. मला माहिती आहे की दुसऱ्यांचं हसू तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. तू आमच्या सर्वांना बघत आहेस, उगवणाऱ्या चंद्राच्या आडून. मला खात्री आहे की आजच्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद असेल. उजळत राहा.. जय भोलेनाथ.' अशी नोट साराने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सुशांतच्या जन्माला आज ३७ वर्षे झाली. परंतु दुर्दैवाने तो आपल्यात नाही. साराने ज्या पद्धतीने सुशांला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर चाहते तिचं कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT