मनोरंजन

अभिनेत्री सविता मालपेकरच्या खांद्यावर राष्ट्रवादीचा झेंडा; लवकरच पक्षप्रवेश निश्चित

संतोष भिंगार्डे


मुंबई ः रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री सविता मालपेकर आता राजकारणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये त्या प्रवेश करणार आहेत. येत्या २५ किंवा २६ जुलै रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अभिनेते खासदार डाॅ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिरूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. आता त्यांच्या पाठोपाठ सविता मालपेकर यादेखील या पक्षात प्रवेश करीत आहेत. याबाबत सविता मालपेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाला, की गेली कित्येक वर्षे मी चित्रपटसृष्टीत काम करीत असताना मला असे जाणवले की काही कलावंत मंडळी अशी आहेत की त्यांना अनेक प्रश्न भेडसावीत आहेत. त्या कलाकारांचे प्रश्न सुटत नाहीत आणि त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचत नाही. आहे. काही वयोवृद्ध कलाकारांना पेन्शनही मिळत नाही. त्यामुळे या कलाकारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर कोणत्या ना कोणत्या पक्षाचा झेंडा आपल्याला हाती घ्यावा लागेल हे माझ्या लक्षात आले. त्यातच कोरोनाने मला माणसांचे स्वभाव दाखविले...माणसं ओळखायला शिकवली.. त्यामुळे आपण काही तरी करायला पाहिजे...आपली कलावंत मंडळी आहेत त्यांच्यासाठी काही तरी करायला पाहिजे हे मी या काळात जाणले. त्याकरिता एखाद्या राजकीय पक्षाचे सहकार्य असणे आवश्यक आहे. त्याकरिता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे. माझे आवडते नेते शरद पवारसाहेब आहेत म्हणून मी या पक्षात जात आहे.  मी कुठल्याही पदासाठी जात नाही. कलाकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणात जात आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT