actress shabana azmi reaction on Rizwan ahmed who become first Muslim actor to nominate for Oscar
actress shabana azmi reaction on Rizwan ahmed who become first Muslim actor to nominate for Oscar  
मनोरंजन

शबानाजी चिडल्या, त्याचं मुस्लिम असणं महत्वाचं की अभिनय 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सध्या रिजवान अहमदची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. ऑस्करच्या बेस्ट एक्टरसाठी त्याला नॉमिनेशन रिजवानला मिळाले आहे. त्याप्रकारे नामांकन मिळवणारा तो पहिला मुस्लिम अभिनेता आहे. रिजवानला नामांकन मिळाल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर काही बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांचाही समावेश आहे. त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यावरुन रिजवानची आणखी चर्चा व्हायला लागली आहे.

शबाना आझमी यांनी सोशल मीड़ियावर एक प्रतिक्रिया दिली आहे. रिझवानला साऊंड ऑफ मेटल या चित्रपटासाठी ऑस्करच्या बेस्ट अॅक्टरसाठी नामांकन मिळाले आहे. त्यावर आझमी यांनी व्टिट करताना असे म्हटले आहे की, तो त्याच्या गुणवत्तेमुळे त्या जागेवर गेला आहे. त्याची गुणवत्ता त्याला मोठं बनवत आहे. असे असताना त्यात धर्म येतो कुठे, गुणवत्तापूर्ण सादरीकरण हेच त्याच्या यशाचे कारण आहे. त्यामुळे सध्या रिझवानच्या मुस्लिम असण्याची चर्चा करणे व्यर्थ आहे. असे आपल्याला वाटत असल्याचे आझमी यांनी सांगितले आहे. आझमी यांच्या अशाप्रकारच्या व्टिटला सोशल मीडियावरुन नेटक-यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

आझमी म्हणाल्या, जेव्हा रिझवानचे ऑस्करसाठी नामांकन झाले त्यावेळी त्याच्या मुस्लिम असण्याला जास्त फोकस करण्यात आले. तो एक चांगला अभिनेता आहे. त्याचे मुस्लिम असणे याला एवढे का महत्व दिले जात आहे हे काही कळत नाही. मला असे वाटते की, त्यानं केलेला अभिनय हा चांगला होता. मी ही त्याच्याबरोबर दोन बांग्ला चित्रपट केले आहेत. टाऊन बँक्वेट आणि रिलेक्टेंट फंडामेंटलिस्ट हे ते चित्रपट होते. तो एक चांगला अनुभव होता.

शबाना आझमी त्यांच्या बंडखोर भूमिकेसाठी प्रसिध्द आहेत. त्यांचे वेगवेगळ्या मुद्यांवर ठाम विचार आहेत. ते सोशल मीडियावर व्यक्त करण्यास घाबरत नाहीत. भारतातील प्रसिध्द कलावंतांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला जातो. आझमी या येत्या काळात स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता यांच्याबरोबर शीर कुर्मा नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT