actress shama ninave launched her poetry book shama sathi  sakal
मनोरंजन

Shama Ninave: या प्रसिद्ध अभिनेत्रीने रसिकांना दिली अनोखी भेट, 'शमा.. साठी'

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शमा निनावे यांनी आपल्या चाहत्यांना एक सरप्राइज दिलं आहे.

नीलेश अडसूळ

shama ninave: कलेच्या प्रांतात मुशाफिरी करत आपल्या अभिनयाचा यशस्वी ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री शमा निनावे आता काव्यसंग्रहाच्या माध्यमातून एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आल्या आहेत. नुकताच त्यांचा 'शमा...साठी’ हा मनमोहक काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला आला आहे. मनाच्या पटलावर उमटलेल्या विविध भावभावनांचे तरंग या काव्यसंग्रहातून शमा यांनी मांडले आहेत.

शमा यांच्या आजवरच्या निवडक कवितांचे संकलन असलेले ‘शमा...साठी’ हे पुस्तक त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त प्रकाशित करून, त्यांचे पती शशांक निनावे यांनी त्यांना सरप्राईज दिलेय. या पुस्तकाचे प्रकाशन 'भिलार' या महाबळेश्वर येथील ‘पुस्तकांच्या गावात’ तेथील कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.

या कवितांच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व कविता शमा निनावे यांचे पती विख्यात वास्तूविशारद श्री. शशांक निनावे यांनी स्व-हस्ताक्षरात लिहून, त्यावर अप्रतिम चित्रांकन केले आहे. त्यामुळे हे कवितांचे पुस्तक सर्वसाधारण न राहता वैशिष्ट्यपूर्ण झालेले आहे. प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे. या कविता साधारण 'हायकू' या जपानी काव्य प्रकारात मोडतात. त्यात कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगितला जातो. निसर्ग, समाज, तत्त्वज्ञान तसेच नाजूक संवेदना आणि भाव सहजपणे शब्दातून पोहोचावा ही या कवितांच्या मागील प्रेरणा आहे. अत्यंत हृदयस्पर्शी व सोप्या भाषेत यातील काव्याची मांडणी केली आहे.

actress shama ninave launched her poetry book shama sathi

या काव्यसंग्रहाबद्दल बोलताना शमा सांगतात की, ‘शब्दांमधून व्यक्त होण्याचं समाधान लिहित्या हातासाठी खूप मोलाचं असतं’. या काव्यसंग्रहाची संकल्पना राजश्री निकम, शिल्पा वडके, कनीनिका निनावे यांची आहे. प्रकाशकाची जबाबदारी अंकित उदेशी तर मुद्र्काची जबाबदारी माधव पोंक्षे यांनी संभाळली आहे. मुखपृष्ठाच्या आतील पोट्रेट खुशी निनावे यांनी काढले आहे. रचना, सुलेखन, रेखाचित्रे शशांक निनावे यांची आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Break-Free Toll Plaza : देशातील पहिला ‘ब्रेक फ्री’ टोल प्लाझा ‘या’ राज्यात झाला तयार! ; २ फेब्रुवारी पासून चाचण्या सुरू

Navjot Kaur Sidhu quits Congress : पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये मोठी घडामोड! ; नवज्योत कौर सिद्धू यांनी अखेर सोडला पक्ष

IND vs NZ, 5th T20I: भारतीय संघाने मैदान मारलं, न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय मिळवला; इशान किशनच्या शतकानंतर अर्शदीपच्या ५ विकेट्स

Railway Toilet Incident Video : "गेट तोडा नाहीतर मी मरेन..." ; माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार अडकले रेल्वेच्या शौचालयात!

Manoj Jarange: रस्ता काट्यांना भरलेला, गिधाडांपासून सावध राहा, मनोज जरांगेंच्या सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT