actress Shilpa Shetty slapped her hair stylist video breaking the internet 
मनोरंजन

शिल्पानं हेअर स्टाईलिस्टला दिली कानाखाली 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. ती तिच्या फिटनेससाठी लोकप्रिय आहे. तिचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स आहे. शिल्पा ब-याच काळानंतर एका चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार होती. तशी ती काही रियॅलिटी शो च्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. याशिवाय योगाची प्रात्यक्षिके करणारे व्हिडिओ पाहणारा मोठा वर्ग शिल्पानं तयार केला आहे. मुंबईमध्ये मोठे पंचतारांकित हॉटेल चालवणा-या शिल्पाला राग अनावर झाल्यावर काय होऊ शकत याचे उदाहरण दाखवून दिले आहे.

त्याचे झाले असे की, एक स्टायलिस्ट शिल्पाचे हेअर सेट करत होता. त्यावेळी असे काय झाले की त्यामुळे शिल्पानं चक्क त्याला कानाखाली मारली. आता ती खरच मारली की ती उगाच नाटक करत होती. हे त्या व्हिडिओमध्ये पाहता येईल. शिल्पा तिच्या स्वॅगसाठी प्रसिध्द असणारी सेलिब्रेटी आहे. ती तिच्या खास अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा फॉलोअर्सही आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिल्पाचा योगा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ती आरोग्याचे महत्व पटवून सांगताना पाहायला मिळाली. त्याच्यापूर्वी शिल्पा आणि तिची बहिण शमिता शेट्टीचा एका मुलाखतीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

शिल्पाचा आताचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिनं तो व्हिडिओ इंस्टावर शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे की, हेअर टच अप करत आहे. कित्येक तास त्यात गेले आहेत. त्यानंतर जे झाले...वास्तविक शिल्पा शेट्टी आणि तिच्या हेअर स्टायलिस्टनं एक फनी व्हिडिओ तयार केला आहे. ज्यात त्यांनी मस्ती केली आहे. शिल्पा लवकरच दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. निकम्मा आणि हंगामा 2 असे त्या चित्रपटांचे नाव आहे. त्यात ती परेश रावल यांच्यासोबत काम करणार आहे. मोठ्या कालावधीनंतर ती रुपेरी पडद्यावर येणार आहे.

 
 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

Mumbai local grocery shops: मुंबई लोकल स्थानकांवर पहिल्यांदाच किराणा दुकाने; कसारा, वासिंद, मानखुर्द येथे ‘प्रवासातच खरेदी’ची नवी सुविधा

Maharashtra: महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कडक निर्बंध लादले; महायुती सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या अधिकाऱ्यांना लागू होणार?

‘फार थोडे दिवस राहिलेत’ आशा भोसले यांचं भावूक वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेल्या...'आता माझं वय झालय'

SCROLL FOR NEXT