actress shilpa shetty fitness mantra why she is so feet sakal
मनोरंजन

Shilpa Shetty: तुम्हाला माहितीय? झीरो फिगर शिल्पा शेट्टी सतत खात असते.. तरीही ती फिट कशी?

'सकाळ-स्वास्थ्यम' या कार्यक्रमात शिल्पाने आपल्या डायट प्लानचा उलगडा केला.

नीलेश अडसूळ

Shilpa Shetty: बॉलिवूडच्या प्रसिध्द अभिनेत्रींपैकीच एक म्हणजे शिल्पा शेट्टी. सध्या ती मनोरंजन क्षेत्रात तितकीशी सक्रिय नसली तर सर्वांचे लक्ष शिल्पा शेट्टीकडे लागलेले असते. त्याचे कारण आहे शिल्पाची फिटनेस, ज्याविषयी ती सोशल मिडियावर सतत बोलत असते. म्हणूनच ती अभिनय आणि सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. पण ती इतकी फिट आहे म्हणजे काही खात नसणार, पथ्य पाळत असणार.. असे आपल्याला वाटते. पण ते साफ चूक आहे. ती भरपूर खाते.. आणि तरीही फिट का आहे, याबाबत तिने स्वतः 'सकाळ-स्वास्थ्यम' या कार्यक्रमात बोलली आहे.
(actress shilpa shetty fitness mantra why she is so feet)

‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत विश्व कल्याणाच्या उद्देशाने आरोग्याचे विविध पैलु उलगडणारा ‘सकाळ स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शिल्पा यांनी ‘किप इट सिंपल : योग ॲण्ड फिटनेस’ विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी तिने तिचा फिटनेस फंडा सांगितला..

शिल्पा म्हणाली, तुम्हाल वाटत असेल मी काही खात नाही.. पण मी खूप खाते.. अगदी मला आवडेल ते खाते.. फक्त रविवारी मात्र मी खूप जास्त खाते. इतरवेळी खात असले तरी पूर्ण डायट असतो. माझा डायट पूर्ण साधा आणि घरगुती स्वरूपाचा असतो. ज्यामध्ये प्रोटीन, कार्बस्, फायबर सगळं योग्य प्रमाणात असतं. मी न्यूट्रिशनची पूर्ण काळजी घेते आणि भरपूर पाणी पिते. मीही तुम्हाला तेच सांगेल.. की तुम्ही रविवारी भरपूर खा.. अगदी हवं ते खा.. पण इतरवेळी आहाराची काळजी घ्यायलाच हवी..

पुढे ती म्हणाली.. ‘‘आपण सतत लोक काय म्हणतील, याचा विचार करतो. हा विचार सोडून आपल्याला काय योग्य वाटते ते करत रहा. जीवनात निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार, योगासने आणि प्राणायाम महत्त्वाचे आहे. हे केल्यास तुमच्यात होणारे बदल हळूहळू जाणवायला लागतील. मनातील अंहकार, राग विरघळून जाईल आणि मन शांत होईल. स्वत:चा शोध घेण्यासाठी आणि अंर्तमनात डोकवण्यासाठी कोणत्याही प्रकारची योगासने, ध्यानधारणा करा,’’ असा सल्ला देत अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी ‘फिटनेस’चा कानमंत्र दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

Latest Marathi News Updates : - पंढरपुरात मुसळधार पावसाची हजेरी, नागरिकांची मोठी तारांबळ उडाली

Hingoli News: अडीच तासांची थरारक प्रतीक्षा; पुरात अडकलेल्या युवकाला ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून वाचवले

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

SCROLL FOR NEXT