मनोरंजन

'संजू'चे कष्ट अख्खा महाराष्ट्र बघतोय, पण..; श्रुती अत्रेची भावनिक पोस्ट

या मालिकेत श्रुती महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे

शर्वरी जोशी

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'राजा राणीची गं जोडी'. या मालिकेच्या माध्यमातून शिवानी सोनार आणि मणिराज पवार ही जोडी घराघरात पोहोचली आणि प्रचंड लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेत ढाले-पाटील कुटुंबात अनेक नवनवीन बदल घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. बेबी मावशीची लाडकी संजू आता PSI होणार आहे. त्यामुळे रणजीत आणि बेबी मावशी या दोघांचीही मान गर्वाने उंच होत आहे. परंतु, संजूच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अभिनेत्री शिवानी सोनार (shivani sonar) कसोशीने प्रयत्न करत असून तिच्या प्रयत्नांची दखल अभिनेत्री श्रुती अत्रेने (Shruti Atre) घेतली आहे. श्रुतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिवानीचं मनापासून भरभरुन कौतुक केलं आहे. (actress Shruti Atre share post for actress shivani sonar)

"आजच्या एपिसोडनंतर सगळे ' संजू ' च भरभरून कौतुक करतील, करतायत. करायलाच हवं. एवढ्या कष्टातून, त्रासातून PSI झाली. पण ही पोस्ट ' संजू ' च कौतुक करण्यासाठी नाहीये. ही पोस्ट 'शिवानी'साठी आहे. संजूचे कष्ट अख्खा महाराष्ट्र बघतोय पण शिवानी 'संजू' साकारण्यासाठी घेत असलेले कष्ट मी खूप जवळून बघतेय. दिवसातले १४-१५ तास न कंटाळता काम करणं आणि तरीसुद्धा २४ तास फ्रेश राहणं, आनंदी राहणं.. त्यात ही स्वतःची काळजी घेणं, एक routine ठरवून त्यात जिद्दीने सातत्य ठेवणं हे तुलाच जमू शकतं. ' संजू ' च्या भूमिकेत झालेला हा मोठा बदल खरतर खूप challenging आहे पण त्यातही पहिल्याच scene मध्ये खूप सहजता आणलीस. क्या बात है. खरंच, तू ग्रेट आहेस", अशी पोस्ट श्रुतीने शेअर केली आहे.

दरम्यान, शिवानी सोनारची ही पहिलीच मालिका असून संजूच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. दिवसातील १४-१५ तास ती सातत्याने काम करत आहे. विशेष म्हणजे तिची ही मेहनत तिच्या अभिनयातून दिसून येत आहे. त्यामुळेच सध्या सर्व स्तरांमधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT