Abhinav Kohli and Shweta Tiwari Team esakal
मनोरंजन

'मुलाला माझ्यापासून वेगळं करायचं होतं', श्वेताचे सिक्रेट्स

अभिनवनंही (Abhinav Kohli) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - प्रसिध्द टेलिव्हिजन अॅक्ट्रेस श्वेता तिवारीनं (actress shweta tiwari) सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावरुन ती चर्चेत आली आहे. त्यातून तिनं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सोसायटीच्या बाहेर असणा-या प्ले ग्राऊंडमध्ये जे काही घडले ते त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. श्वेता यापूर्वी तिच्या पतीबरोबरच्या वादामुळे चर्चेत आली होती. तिचा पूर्वाश्रमीचा पती असणारा अभिनव कोहलीनं त्यांच्या मुलाला श्वेतापासून (actress shweta tiwari) हिसकावून घेतलं. हे सगळं त्या व्हि़डिओच्या माध्यमातून दिसून आलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात (Social Media) चर्चेचा विषय आहे.

टीव्ही अॅक्ट्रेस श्वेता तिवारीला सध्या डॉमेस्टिक व्हायोलन्सचा (Domestic Violence) सामना करावा लागत आहे. त्यामुळे ती त्रस्त झाली आहे. ज्यावेळी श्वेतानं तो व्हिडिओ सोशल मीड़ियावर शेअर केला तेव्हापासून तिच्या चाहत्यांनी तिला सपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून श्वेतानं आपली बाजु मांडली आहे. जे काही घडलं ते किती भयानक होतं हे तिनं त्यावेळी सांगितले आहे. त्या व्हिडिओमध्ये तिचा मुलगा रेयांश खेळत होता. तिनं त्याला कडेवर घेतलं होत. मात्र अचानक अभिनव त्या मुलाला तिच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

अभिनवनंही (Abhinav Kohli) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. रात्री दीड वाजण्याची वेळ होती. त्या व्हिडिओमध्ये 14 ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यानची ती घटना असावी असे म्हटले गेले आहे. त्यानं आपल्या फोनमध्ये तो व्हिडिओ तयार केला आहे. आपल्या फॅन्सला तो व्हिडिओ त्यानं दाखवला आहे. अभिनव म्हणतो गेल्या वर्षापासून मला माझ्या मुलापासून वेगळं ठेवलं गेलं आहे. मला त्याला भेटायचे आहे. अशावेळी मी जेव्हा वुमन्स सेल, कधी कमिशनर यांच्याकड़े गेल्यानंतरही मला न्य़ाय मिळाला नाही.

तुम्हाला सांगतो की रियांशला तिच्याजवळ राहायचे नाही. 24 ऑक्टोबरला जे काही झाले ते त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यावेळी रियांश सांगतो आहे की मला तिच्याकडे जायचे नाही. मी देखील श्वेताला मनवण्याचा प्रयत्न करतो आहे. शेवटी मला पोलिसांना बोलवावे लागले. अभिनवनं चाहत्यांना सांगितले आहे की, तुम्ही केवळ एकाच बाजूनं विचार करु नका. माझाही बाजु लक्षात घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT