actress Simi Grewal trolled calling Meghan Markle evil post interview to Orpah winfrey 
मनोरंजन

ब्रिटीश राजपुत्र आणि राणी 'वाईट'; माफी मागावी लागली

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - ब्रिटीश राजपुत्र हॅरी मार्कले आणि त्याची पत्नी मेगन मर्केल यांची एक मुलाखत सध्या मोठ्या वादाचा विषय ठरताना दिसत आहे. त्याचे झाले असे की, मेगनची मुलाखत प्रसिध्द मुलाखतकार ओप्रा विन्फ्रेनं मुलाखत घेतली. त्यावेळी तिनं जे काही धक्कादायक खुलासे केले त्यामुळे ती चर्चेत आली आहे. त्यावरुन सोशल मीडियावर त्या मुलाखतीचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले आहे. त्यात बॉलीवूडची कोणेएकेकाळची प्रसिध्द अभिनेत्री सिमी ग्रेवालची भर पडली आहे. तिनं त्या मुलाखतीवर जे व्टिट केले होते. त्यामुळे तिला ट्रोल व्हावे लागले होते. तसेच तिला नंतर माफीही मागावी लागली होती.

सिमीनं त्या रॉयल परिवारातील सदस्यांचा अपमान केल्याची भावना काही नेटीझन्सनी व्यक्त केली आहे. मेगननं रंगभेदावरुन विशेष टिप्पणी केली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. त्याप्रकारावरुन आपल्या मनात आत्महत्येचा विचार आल्याचे तिनं सांगितले होते. सिमीनं त्यांना राक्षस असे म्हटले आहे. त्यामुळे तिच्यावर टीका करण्यात आली आहे. त्या वाढत्य़ा टीकेमुळे अखेर तिला माफी मागावी लागली आहे. सोशल मीडियावर सिमीला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. आपल्या बोलल्याचा काय परिणाम होईल याची तिला कदाचित कल्पना नसावी. त्यामुळे सिमीनं अशाप्रकारे प्रतिक्रिया दिल्याचे नेटक-यांनी सांगितले आहे.

मेगनची मुलाखत ओप्रानं घेतल्यानंतर सिमीनं सोमवारी एक व्टिट केले. त्यामुळे ती चर्चेत आली. सिमी ही रात्रभर ट्रोल होत राहिली. सिमीनं आपल्या व्टिटमध्ये लिहिलं आहे की, मला मेगननं जे काही सांगितलं त्याच्यावर काडीचाही विश्वास नाहीये. एका शब्दावरही नाही. ती स्वतला पीडित दाखवण्यासाठी अशाप्रकारच्या गोष्टी सांगत आहे. ती खोटं बोलत आहे. तसेच तिला सहानुभुती हवी असल्यानं तिनं रंगभेदाचा उपयोग केल्याचा आरोपही सिमीनं यावेळी केला होता. ती राक्षस आहे.

लंडनच्या रॉयल परिवाराचे समर्थन करणा-या करोडो लोकांना सिमीचे व्टिट काही आवडले नाही. आणि त्यांनी 73 वर्षीय अभिनेत्री सिमीला बोलण्यास सुरुवात केली. कुठलाही पुरावा नसताना ती एका प्रतिष्ठीत परिवारावर अशा पध्दतीनं टीका करु शकत नाही. अशी भावना काही नेटीझन्सनी व्यक्त केली आहे. 
 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT