sofia hayat and abhinav shukla
sofia hayat and abhinav shukla instagram
मनोरंजन

'वन नाइट स्टँड'वरून ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीचं उत्तर

स्वाती वेमूल

टेलिव्हिजन अभिनेता अभिनव शुक्लासोबत Abhinav Shukla 'वन नाइट स्टँड'चा आरोप करणाऱ्या ट्रोलरला 'बिग बॉस'ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री सोफिया हयातने Sofia Hayat उत्तर दिलं आहे. संबंधित ट्रोलरने सोफिया आणि अभिनवविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचीही धमकी दिली आहे. तर सोफियाने अभिनवला ओळखतही नसल्याचं म्हटलं आहे. 'गुगलवर सर्च केलं तेव्हा मला समजलं की अभिनव शुक्ला कोण आहे', असं तिने स्पष्ट केलं. (actress slams troll accusing her of one night stand with Abhinav Shukla)

इन्स्टाग्रामवर आलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट सोफियाने शेअर केले. 'तुझ्यात आणि अभिनव शुक्लामध्ये काय सुरू आहे, हे मला सर्व माहित आहे. शरीरसुखासाठी त्याने तुझा वापर केला. मी तुझ्या आणि वन नाइट स्टँड पार्टनर अभिनवविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे', असा तो मेसेज आहे. त्यावर सोफियाने लिहिलं, 'मला एका अकाऊंटवरून हे मेसेज आले. ही माझी चूक होती. खरंतर मी डीएम (डायरेक्ट मेसेज) शक्यतो तपासत नाही. पण तिने मदत मागण्याचं नाटक करत माझ्याशी संपर्क साधला. काही मिनिटांनंतर मला समजलं की ती व्यक्ती खोटी आहे. म्हणून मी तिला ब्लॉक केलं. त्यानंतर दुसरा अकाऊंट उघडून तिने मला हे मेसेज केले. अशा लोकांना कोणीच घाबरलं नाही पाहिजे.'

अभिनव शुक्लासोबत वन नाइट स्टँडच्या आरोपांवर ती पुढे म्हणाली, 'मी त्या व्यक्तीला कधी भेटले नाही, त्याच्यासोबत कधी काम केलं नाही आणि आम्ही एकमेकांचे मित्रसुद्धा नाही. गुगलवर सर्च केल्यानंतर मला समजलं की अभिनव शुक्ला कोण आहे?' सोफियाने संबंधित ट्रोलरला समजावण्याचाही प्रयत्न केला. सोफियाने २०१३ साली 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात भाग घेतला होता. ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT