actress Surekha kudchi reel video viral on ved laglay  sakal
मनोरंजन

Surekha kudchi:बाबो! पन्नासाव्या वर्षी नववारी नेसून थिरकल्या सुरेखा कुडची, Video पहाच!

अभिनेत्री सुरेखा कुडची यांची एक रील सध्या बरीच व्हायरल होत आहे.

नीलेश अडसूळ

surekha kudchi: मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील एक गाजलेलं आणि चर्चेतलं नाव म्हणजे अभिनेत्री सुरेखा कुडची. सुरेखा यांनी आजवर अनेक चित्रपट केले. 1995 ते 2000 च्या दशकातला काळ अक्षरशः त्यांनी गाजवला आहे. सध्या त्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून आपल्या समोर येत आहेत. गेल्यावर्षी बिग बॉस मराठीचे पर्वही त्यांनी गाजवले. सध्या त्या कलर्स मराठी वरील 'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेत सूर्यकांता सरनाईक या महत्वाच्या भूमिकेत आहेत. याच मालिकेच्या सेटवर त्यांनी एक भन्नाट व्हिडिओ शूट केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे.

(actress Surekha kudchi reel video viral on ved laglay)

मालिका आणि मालिकेच्या सेटवर बरीच धमाल होत असते. सध्या ही धमाल आपल्या पर्यन्त पोहोचते कारण सगळे कलाकार सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे व्हिडिओ, फोटो आणि रिल्सच्या माध्यमातून या गमतीजमती आपल्यापर्यंत पोहोचत असतात.

अभिनेत्री सुरेख कुडची या केवळ अभिनेत्री नाही तर उत्तम नृत्यांगना आहेत. त्यांनी अनेक लावण्यांवर आपले नृत्य केले आहे. त्यामुळे त्यांचा डान्स पाहण्यासाठीही चाहते आतुर असतात. असाच एक व्हिडिओ सुरेखा यांनी शेयर केला आहे. चक्क नववारी नेसून, गॉगल लावून त्या थिरकल्या आहेत. आणि गाणं आहे मला वेड लागलंय..

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

सध्या महाराष्ट्रात प्रितेश आणि जिनिलिया यांच्या वेड सिनेमाचं वेड लागलेलं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही 'वेड'सिनेमाचीच हवा आहे. संगितकार अजय अतुल यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. त्यातही जिथे तिथे प्रत्येक जन 'वेड लागलंय' या गाण्यावर थिरकत आहे. अशातच सेटवर शूट करताना सुरेखा यांनाही या गाण्यावर नाचायचा मोह आवरला नाही. सुरेखा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT