Actress swara bhasker File
मनोरंजन

'तो' सीन दिला तर त्यात चूक काय? स्वरा होतेय ट्रोल

सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून स्वराच्या नावाचा उल्लेख करता येईल.

युगंधर ताजणे

सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून स्वराच्या नावाचा उल्लेख करता येईल. ती नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपल्या प्रतिक्रिया मांडत असते. यावरुन तिला अनेकदा वादालाही सामोरं जावं लागलं आहे. आताही स्वरा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं तालिबानी आणि हिंदूत्ववाद्यांची तुलना केली होती. त्यामुळे तिच्यावर सडकून टीका झाली होती. करिना कपूरच्या बाजुनंही तिनं एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्याचाही फटका तिला बसला होता. करिनाला तिच्या मुलाच्या नावावरुन जी नावं ठेवली जात होती, त्या नावं ठेवणाऱ्यांना स्वरानं गाढव असं म्हटलं होतं.

आता स्वरा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिनं आपल्या एका चित्रपटातील सीनविषयी केलेलं भाष्य. वीरे द वेडिंमध्ये तिनं मास्टरबेशनचा एक सीन दिला होता. ज्यामुळे ती चर्चेत आली होती. सध्या त्यावरुन स्वरावर टीका होताना दिसतेय. त्या पोस्टवर तिचं असं म्हणणं आहे की, तो सीन करताना मला काही वाटण्यासारखं नव्हतं. तो सीन सुरु असताना कुठल्या एका फुलाचा फोटो शेयर करावा असे मला वाटले नाही. त्यावर तिला ट्रोलर्सनं घेरलं आहे. त्यांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. त्यातील काही कमेंट खालच्या पातळीवर जात केल्या गेल्या आहेत. याचा राग स्वराला आहे. त्यामुळे तिनं अशा ट्रोलर्सलाही फटकारलं आहे.

स्वरानं याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात ती म्हणते, सोशल मीडिया हा एक व्हर्चुअल जागा आहे. त्याला आपण किती महत्व द्यायचे हे ठरवता आलं पाहिजे. तसे जर केले नाही तर आपली गल्लत होती आहे लक्षात घ्यायला हवे. मात्र सध्या सोशल मीडियावर जेव्हा तुम्ही ट्रोल होता तेव्हा अनेक सामाजिक संकेत हे धुडकावले जात आहेत. त्याला फारशी किंमत दिली जात नाही. आता मी ज्यावेळी त्या चित्रपटामध्ये तो सीन दिला तेव्हा मला त्यावेळी एका फुलाचा फोटो पोस्ट करावा असे वाटले नाही. त्या चित्रपटाची आणि दिग्दर्शकाची गरज या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. हे आपण लक्षात घ्यायला हवे. असेही स्वरानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT