actress swarangi marathe entry in aai kuthe kay karte serial new twist sakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या नात्यात वादळ? अभिनेत्री स्वरांगी मराठेची एण्ट्री

आई कुठे काय करते मालिकेत मोठा ट्विस्ट!

नीलेश अडसूळ

Aai Kuthe Kay Karte: स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आशुतोषच्या वाढदिवशी अरुंधती आशुतोषच्या बाबतीतला सर्वात मोठा निर्णय घेणार होती. म्हणजेच ती त्याल मनातल्या भावना सांगणार होती. पण आता मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत अनुष्काची एण्ट्री झाली असून आता अरुंधतीला तिच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागणार आहे.

(actress swarangi marathe entry in aai kuthe kay karte serial new twist)

अनुष्का म्हणजेच आशुतोषची खूप जुनी मैत्रीण. बऱ्याच वर्षांनंतर या दोघांची पुन्हा भेट होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरांगी मराठे अनुष्का ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अनुष्का या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना स्वरांगी म्हणाली, ‘मी आई कुठे काय करते या मालिकेची खूप मोठी चाहती आहे. खऱ्या आयुष्यात मी दोन मुलांची आई असल्यामुळे आई काय काय करु शकते याचा अनुभव घेतच आहे. अश्यातच या भूमिकेसाठी विचारणा झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता मी होकार दिला.'

पुढे ती म्हणाली, 'घरच्यांची खंबीर साथ असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. गेले कित्येक दिवस स्वरांगी तू सध्या काय करतेस हा प्रश्न मला नेहमी विचारला जायचा. आता मी अभिमानाने सांगू इच्छिते की स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये मी अनुष्का ही व्यक्तिरेखा साकारतेय. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखने सेटवर सर्वांची ओळख करुन दिली. देशमुख कुटुंबाने मला सामावून घेतलं आहे. सेटवर खुपच सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळेच काम करताना खूप मजा येतेय. आमचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांच्यामुळे अनुष्का हे पात्र खुलवण्यासाठी खूप मदत होतेय अशी भावना स्वरांगी मराठेने व्यक्त केली.

अनुष्काच्या येण्याने अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात कोणतं वळण येणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. आता अरुंधती काय निर्णय घेणार, ती आशुतोषपासून दूर जाणार का असाही प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: वेतन आयोगाचा अहवाल आल्यानंतर लगेचच पगार वाढणार का? सरकार काय घेऊ शकते निर्णय?

SHEHBAZ SHARIF: भारताला हरवताच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जल्लोष! शहबाज शरीफ यांनी केली अशी पोस्ट सोशल मीडियावर उडाली खिल्ली; नेमकं काय घडलं?

Koyna Dam Controversy : दुष्काळात पाणी वाचवण्याचा 'महाप्रकल्प'! अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी पुन्हा कोयनेच्या शिवसागर जलाशयात? 1500 कोटींच्या प्रस्तावाची जोरदार चर्चा

पॅन्ट काढली अन् गुप्तांगात..., पूर्णेकर समर्थकांना पोलिसांची थर्ड डिग्री; अमानुष मारहाण करत अपमानास्पद कृत्य करायला लावलं

Marathi News Live Updates : सांगोल्यात शेतीपंपांच्या वीज पुरवठ्यावरून शेतकरी आक्रमक; महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे!

SCROLL FOR NEXT