tanya robert 
मनोरंजन

'बॉन्ड'पटातील अभिनेत्री तान्या रॉबर्ट्स जिवंत; ऑनलाईन मुलाखत देताना नवऱ्याला आला कॉल

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : जेम्स बॉन्ड सिरीजमधील प्रसिद्ध फिल्म 'अ व्यू टू किल'मध्ये काम केलेल्या हॉलिवूड अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. मात्र आता ही बातमी खोटी असल्याची माहिती मिळत आहे. तिचे  पती लान्स ओ ब्रायन यासंदर्भात एका ऑनलाईन इंटरव्ह्यूमध्ये होते. त्या दरम्यान असताना त्यांना याबाबतचा कॉल आला.  तुम्ही मला आता सांगत आहात की ती जिवंत आहे? त्यांनी रॉबर्ट जिवंत असल्याचं कळल्यावर आश्चर्याने म्हटलं. फोन ठेवून त्यांनी त्या इंटरव्ह्यूदरम्यानच म्हटलं की ती जिवंत आहे, मला आयसीयूमधून फोन आला आहे. 

हॉलिवूड अभिनेत्री तान्या रॉबर्ट्स या आजारी पडल्यामुळे दवाखान्यात ऍडमिट आहेत. काही बातम्यांमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली गेली होती. मात्र, ही बातमी खोटी असल्याचे आता समजत आहे. रॉबर्ट्सचे पीअर माइक पिंगल यांनी आता मीडियाला माहिती दिली आहे की, तान्या रॉबर्ट्स जिवंत आहेत मात्र त्यांची अवस्था बिकट आहे. 24 डिसेंबर रोजी आजारी पडल्यानंतर रविवारी तान्या रॉबर्ट्स यांचं निधन झाल्याची बातमी आलेली. मात्र, आता हॉस्पिटलने निर्वाळा दिला आहे की त्या जिवंत आहेत. ख्रिसमस दिवशी तान्या आपल्या पाळीव कुत्र्यासोबत फिरायला गेल्या होत्या आणि येताना त्या बेशुद्ध होऊन कोसळल्या. यानंतर तान्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. तिथे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

तान्या रॉबर्ट्सचे खरे नाव व्हिक्टोरीया लीग ब्लम होते. त्यांनी मॉडेलिंगमध्ये आपलं करिअर करण्यास सुरवात केली. त्यांनी 1975 मध्ये हॉरर फिल्म 'फोर्स्ड एंट्री'मधून ऍक्टींगमध्ये डेब्यू केला होता. तान्या यांनी डिटेक्विट शो 'चार्लीच एंजल्स'मध्येही काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT