uorfi javed Sakal
मनोरंजन

Uorfi Javed: उर्फी झाली दुःखी', म्हणाली 'बिग बॉस'मध्ये जाण्यापूर्वी माझ्याकडे...'

उर्फी जावेदने 'बिग बॉस' ओटीटीद्वारे घराघरात नाव कमावले. आज ही अभिनेत्री तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.

Aishwarya Musale

उर्फी जावेद आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. आज प्रत्येकजण तिच्याबद्दल आणि तिच्या अतरंगी ड्रेसिंग सेन्सबद्दल जागरूक आहे. ज्यांना उर्फी आवडते ते तिच्या लेटेस्ट पोस्टची प्रतीक्षा करतात, ज्यांना ती आवडत नाही ते देखील उर्फीची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या उर्फीने स्वतःबद्दल असे काही खुलासे केले आहेत, जे ऐकल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

उर्फीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, जेव्हा तिला 'बिग बॉस' ओटीटीमध्ये जावे लागले तेव्हा तिच्याकडे स्वत:साठी कपडे खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. ज्या कपड्यांमध्ये लोक मला मीडियासमोर बघायचे ते सगळे पैसे उधार घेऊन घेतलेले होते. याशिवाय तिला आता आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे का असे विचारले असता ती म्हणाली, मला आता असे वाटते.

उर्फीने आपल्या मुलाखतीत सांगितले की, 'बिग बॉस' ओटीटी दरम्यान मी लोकांकडून पैसे घेतले होते जेणेकरून मला काही कपडे शिवून घेता येतील. गेल्या वर्षीपर्यंत माझ्याकडे भाडे आणि जेवणासाठीही पैसे नव्हते. माझे काही मित्र होते ज्यांच्या घरी मी जेवायचे.

उर्फीने पुढे सांगितले की, त्यावेळी टेन्शन फक्त कपडे, शूज खरेदी आणि मेकअपचे होते. दुसरीकडे, आज मी पैसे वाचवू शकत नाही, परंतु मी अनावश्यक खर्च करत नाही. मी पार्लरला जात नाही. माझ्याकडे लग्जरी वस्तू नाहीत. माझ्यावर खूप जबाबदारी आहे, माझ्यासाठी काम करणाऱ्यांचा पगार मला द्यावा लागतो. पैसा येतो आणि माझ्याबरोबर जातो, मी सध्या कोणतीही बचत करू शकत नाही.

उर्फीने आपल्या अभिनय कारकिर्दीला छोट्या पडद्यापासून सुरुवात केली होती. तिला बिग बॉस OTT मधून ओळख मिळाली. आज उर्फी सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. चाहते तिच्या फोटो-व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्री अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT