Urfi Javed Esakal
मनोरंजन

Urfi Javed: चित्रा वाघ यांच्या धमकीला दिली नाही किंमत, उर्फी नव्या दमाने नव्या स्टाईलमध्ये

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद तिच्या ऑफबीट ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. ती नेहमीच रंगीबेरंगी आणि चित्रविचित्र फॅशनचे कपडे घालून रस्त्यावर फिरत असते. ती कधी कोणती फॅशन करेल हे सांगता येत नाही. उर्फीला यासाठी अनेकदा ट्रोलही करण्यात आले आहे. मात्र, उर्फीला याचा काही फरक पडत नाही.

उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे.

त्यातच आज भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हिडीओ शेअर करत ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये चित्रा वाघ म्हणतात, "श्शीSSS...अरे हे काय चाललंय मुंबईत? रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला, मुली विकृतांच्या शिकार होतायत तर ही बया अजून विकृती पसरवतीये."

त्यामूळं आता उर्फीचं काही खरं नाही. तिच्यावर कायदेशीर कारवाई होइलं असं वाटतं होतं. यावर उर्फीनं काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र उर्फीने तिचा नवीन व्हिडिओ पोस्ट केला आणि पुन्हा एकदा टिका करणाऱ्यांना प्रतिउत्तर दिलयं.

उर्फी जावेदने नवीन वर्षाच्या आधी आणखी एक विचित्र फॅशन चाहत्यांसमोर सादर केली आहे. तिच्या लेटेस्ट लूकमध्ये उर्फीने नखांनी ड्रेस बनवला आहे. तिने गुलाबी रंगाच्या नकली नखांचा वापर करुन ड्रेस तयार केलाय. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT