Urmilla Kothare esakal
मनोरंजन

Urmilla Kothare: ब्रेकअप झालंय ? आठवण येतेय...उर्मिला कोठारेची पोस्ट चर्चेत

उर्मिलाच्या या पोस्टमुळं मराठी सिनेसृष्टीत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मराठी सृष्टीतील एक दिलखुलास सेलिब्रिटी कपल म्हणून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्याकडे पाहिलं जातं. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये दुरावा असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता उर्मिलाने नुकतीचं शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्यामुळे दोघांच्यातील दुराव्याची पुन्हा एकादा चर्चा रंगली आहे. (actress Urmilla Kothare instagram post viral )

उर्मिलानं नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. उर्मिलानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ब्रेकअप झालंय ? अबोला धरलाय ? आठवण येतेय खूप ? त्रास होतोय ना..! कानात हेडफोन्स घाला आणि फक्त फिल करा...' असं उर्मिलाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

उर्मिलाच्या या पोस्टमुळं मराठी सिनेसृष्टीत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. मात्र, यासर्वात काहीही तथ्य नसुन उर्मिला तिच्या ऑटोग्राफ या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे.

'ऑटोग्राफ' या चित्रपटातील अधुरे-अधुरे हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. याच गाण्याबद्दल सांगण्यासाठी उर्मिलानं ही पोस्ट शेअर केली आहे.

ऑटोग्राफ चित्रपट सतीश राजवाडे दिग्दर्शित करतोय. उर्मिलासोबतच या चित्रपटात, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, मानसी मोघे यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.

रंगली होती घटस्फोटाची चर्चा

आदिनाथ कोठारे गेल्या काही महिन्यांपासून चंद्रमुखी चित्रपटानिमित्त व्यस्त पाहायला मिळाला. त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनला उर्मिलाने कुठेच हजेरी लावलेली पाहायला मिळाली नाही. तसेच इन्स्टाग्रामवरून उर्मिलाने आदिनाथला अनफॉलो केलं आहे अशीही चर्चा पाहायला मिळाली. उर्मिलाने ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून पुनरागमन केले मात्र स्वतःची निर्मिती संस्था असून देखील तिने दुसऱ्या निर्मिती संस्थेतून पुनरागमन का केले ? असा प्रश्न मीडियाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला.

याशिवाय आदिनाथ आणि उर्मिला एकाच बिल्डिंगमध्ये राहत असले तरी उर्मिला वेगळ्या फ्लॅटमध्ये राहते अशीही चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. याशिवाय ४ मे रोजी उर्मिलाचा वाढदिवस असतो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आदिनाथ नेहमीच तिच्यासोबतचे बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत असतो मात्र ह्या वाढदिवसाच्या दिवशी आदिनाथने उर्मिलाला साध्या शुभेच्छा देखील दिलेल्या पाहायला मिळाल्या नाहीत असेच चित्र पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT