actress vanita kharat talk about her weight and personal life in sony marathi instagram live maharashtrachi hasyajatra  sakal
मनोरंजन

Vanita kharat: वनिता म्हणते, मी नवरात्रीचे उपवास करत नाही, कारण ऐकून म्हणाल..

हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात हिने एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यबाबत खुलासा केला आहे.

नीलेश अडसूळ

Maharashtrachi Hasyajatra : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे अभिनेत्री 'वनिता खरात'. तिनं साकारलेली उत्तरप्रदेशची बाई असो, सासूबाई असो किंवा लहान मुलगी.. तिच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला हसवलं आहे. नुकतीच ती सोनी मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून लाईव्ह आली होती. यावेळी तिनं वैयक्तिक आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. (actress vanita kharat talk about her weight and personal life in sony marathi instagram live maharashtrachi hasyajatra)

अभिनेत्री म्हटलं की सडपातळ बांधा, गोरा रंग असं काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण या सर्व चौकटी मोडून अभिनय क्षेत्रात नवा प्रवाह निर्माण करणारी वनिता खरात कायमच प्रेक्षकांना भावली आहे. तिचं टायमिंग, अभिनय कौशल्य, वजनाचा कुठेही न येणारा अडसर यामुळे तिने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवरात्री निमित्त ती सोनी मराठीच्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये आली होती. यावेळी तिने चाहत्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या. या लाईव्हमध्ये तिने वजन, मेकअप आणि अशा अनेक खासगी आयुष्यातील गोष्टींवर प्रकाश टाकला.

यावेळी वनिता खरातला एका चाहत्याने विचारलं तुम्ही नवरात्रीचे उपवास करता का? त्यावर वनिता म्हणाली, 'नवरात्रीचे उपवास मी कधीच करत नाही. कारण उपवासाने मी बारीक झाले तर…' वनिताने अगदी गंमतीने या प्रश्नावर उत्तर दिलं. तिच्या या उत्तराने प्रत्येकालाच हसू आलं.

याशिवाय अभिनेत्री असली तरी तिला मेकपची फारशी आवड नसल्याचंही ती म्हणाली. 'मला मेकअप करायला अजिबात आवडत नाही. मला अगदी साधेपणा आवडतो. बघा आताही मी लाइव्हसाठी अगदी मेकअप न करता बसली आहे.' असं वनिता म्हणाली. तिच्या या लाईव्हला अनेक चाहत्यांनी हजेरी लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT