actress varsha dandale angry reaction on rumors of her health and accident  sakal
मनोरंजन

Varsha Dandale: 'यांना काही काम धंदे नाहीत का?' वच्छी आत्या भाकडल्या..

अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या आजारपणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याने त्या चांगल्याच भडकल्या.

नीलेश अडसूळ

varsha dandale: मालिका विश्व गाजवणाऱ्या एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे वर्षा दांदळे. छोट्या पडद्यावरील त्यांची प्रत्येक भूमिका ही लोकप्रिय झाली आहे. पण झी मराठी वरील 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून 'वच्छी आत्या' म्हणून समोर आल्या. त्यांची हि भूमिका आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. सध्या त्या 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत सासूच्या भूमिकेत आहेत. त्या कायमच वेगवेगळे रील्स, फोटो शेअर करत असतात पण आज चक्क त्या भडकल्या आहे. सोशल मीडिया वरील एका पोस्टवर कमेंट करून त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. (actress varsha dandale angry reaction on rumors of her health and accident )

वर्षा दांदळे यांचा 2021मध्ये अपघात झाला होता. वर्षा यांनी सोशल मीडियावर स्वत:चा फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. त्यांच्या पायाला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी माझ्यासाठी प्रार्थना करा असं आवाहन वर्षा यांनी केलं होतं. त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षकांकडूनही त्यांना लवकर बरं होण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. तसेच मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची चौकशी केली होती. पुढे तसुदैवाने त्या या अपघातातून सावरल्या आणि पूर्णतः बऱ्या झाल्या. आता त्यांनी पुनः एकदा जोमाने कामाला सुरुवात केली आहे.

सध्या त्या झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत राघवच्या आईची भूमिका साकारत आहेत. त्यांनी आपले नावे आयुष्य सुरू केले तरी नेटकरी मात्र सतत त्याच जुन्या अपघाताबाबत त्यांना विचारताना दिसतात. किंबहुना काही नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर त्यांच्या आजारपणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे.

actress varsha dandale angry reaction on rumors of her health and accident

सोशल मीडियावरील एका पोर्टलनं वर्षा दांदळे अजूनही अंथरूणाला खिळून आहेत अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसताच वर्षा यांनी संबंधीत पोर्टलला चांगलंच खडेबोल सुनावले आहे. 'मी छान ठणठणीत आहे. कोण आहेत ही माणसं. यांना कामधंदे नाहीत का काही,' अशा शब्दांत वर्षा दांदळे यांनी चुकीची माहिती पसरवणाऱ्यांचे तोंड बंद केले आहे. त्यांच्या या कमेंटची सध्या बरीच चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Switzerland Bar Explosion : नवीन वर्ष साजरं करतानाच बारमध्ये भीषण स्फोट; अनेक पर्यटक ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती!

Satara Accident : मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेला युवक 400 फूट खोल दरीत पडून गंभीर जखमी; कास पठाराच्या मार्गावर दुर्घटना

Indian Navy: नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार! ‘तारागिरी’, ‘अंजदीप’ युद्धनौका लवकरच सेवेत

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये टोलनाका चालकांकडून मारहाण, कारवाईच्या मागणीसाठी टोलनाक्यावरच रस्ता रोको सुरू

Success Story Women Farmers : कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीतही महिलाराज; उद्योजकतेचा दिला साज

SCROLL FOR NEXT