actress Varsha Usgaonkar travel in mumbai local train sakal
मनोरंजन

Varsha Usgaonkar: अभिनेत्री वर्षा उसगावकर चक्क लोकलमध्ये.. महिला डब्यातून फोटो केला शेयर..

सेलिब्रिटींनी लोकल ट्रेन मधून प्रवास करणं हा प्रवाशांसाठीही मोठा आनंदाचा क्षण असतो.

नीलेश अडसूळ

varsha usgaonkar: मराठी मनोराज विश्वातिल एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. गेली कित्येक वर्षे चित्रपत्र, मालिका, नाटक या माध्यमातून त्या आपले मनोराज करत आहेत. त्यांच्या फिटनेसची प्रचंड चर्चा असते. वयाच्या 55 व्या वर्षीही त्यांनी स्वतःला मेंटेन ठेवले आहे.

त्या सोशल मिडियावरही प्रचंड सक्रिय असतात. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नंदिनी शिर्के पाटील ही भूमिका साकारत आहे. त्यांची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय आहे.

नुकताच त्यांनी स्वतःची गाडी सोडून चक्क लोकल प्रवास केला. त्यांच्या चाहत्यांसाठी आणि प्रवाशांसाठी हा मोठा सुखद धक्का होता. त्याचे फोटो वर्षा उसगावकर यांनी शेयर केले आहेत.
(actress Varsha Usgaonkar travel in mumbai local train)

मनोरंजनविश्वातील कलाकार सहसा जनमानसात येत नाहीत. चित्रीकरण, इव्हेन्ट यामध्ये कायम वैयक्तिक वाहनाचाच ते वापर करतात. पण कधीतरी काही प्रसंगांमुळे किंवा सहजच अनुभव म्हणून काही कलाकार सार्वजनिक वाहनाने प्रवास करतात. या प्रवासात आलेले अनुभव आणि त्याचे फोटोही कलाकार आवर्जून शेअर करतात.

अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकी, सोनू सुद, सोनाली कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसात लोकल प्रवास केला आहे. त्यात आता एका दिग्गज अभिनेत्रीची भर पडली आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनीही लोकल ट्रेनने प्रवास करत फोटो शेयर केले आहेत.

actress Varsha Usgaonkar travel in mumbai local train

यावेळी त्या मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे हा महिला दबा असून गर्दीने तुडुंब भरलेला आहे. वर्षा उसगावकर स्वतः उभं राहून प्रवास करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या तोंडावर कोणताही मास्क नाही. त्या खुलेपणाने लोकलमध्ये वावरल्या. त्यामुळे प्रवाशांनाही त्यांच्यासोबत मनसोक्त फोटो काढता आले. हे सगळे फोटो वर्षा यांनी आपल्या instagram स्टोरीला शेयर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT