actress veena jagtap shared photo in saree traditional look and said in love  sakal
मनोरंजन

Veena Jagtap: प्यार हुआ.. इकरार हुआ.. वीणा जगतापची 'ती' पोस्ट अन् चर्चेला उधाण..

वीणा जगतापने एक पोस्ट शेयर केली आहे., ज्यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

नीलेश अडसूळ

veena jagtap: 'राधा प्रेम रंगी रंगली', 'आई माझी काळुबाई' यासारख्या दर्जेदार मालिकांमधून प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री वीणा जगतापचा चाहता वर्ग मोठा आहे. वीणा 'बिगबॉस' मध्येही सामील झाली होती.

ती तिच्या कामापेक्षा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. वीणा आणि शिव ठाकरे यांचे बिग बॉस मध्ये जुळलेले प्रेम बरेच चर्चेत होते पण ते फार काळ टिकू शकले नाही. त्या नंतर दोघेही वेगळे झाले. आता वीणाने प्रेमा विषयी एक पोस्ट शेयर केली आहे. की पाहून चर्चेला उधाण आले आहे.

(actress veena jagtap shared photo in saree traditional look and said in love )

वीणाच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. अत्यंत पारंपरिक बाजातील हे फोटो आहेत. ज्यामध्ये वीणाने तपकिरी रंगाची साडी नेसली असून गजरा, बांगड्या, ठूशी असा पारंपरिक लूक केला आहे. यावेळी लक्ष वेधून घेतलं ते वीणाच्या भांगेतील कुंकाने.. या शूट वेळी वीणा कुंकू लावल्याने हे नेमकं कुणासाठी असा प्रश्न तिला अनेकांनी विचारला आहे.

सोबतच वीणाने या फोटोला दिलेले कॅप्शन लक्षवेधी ठरले आहे. ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ असं ती म्हणाली आहे. त्यासोबत तिने दोन हार्ट इमोजी शेअर केले आहेत. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. 'कोण आहे तो नशीबवान मुलगा',ज्याची तू पत्नी होणार आहे', 'तू खूप सुंदर दिसतेस', 'भांगेतले कुंकू कुणासाठी 'अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत.

या फोटोमुळे शिव आणि वीणा यांचं पुन्हा जुळलं का असंही बोललं जात आहे. पण सध्या शिव आणि वीणा यांच्यात कोणतेही प्रेमसंबंध नाही. पण बिग बॉस मध्ये असताना वीणाने आवर्जून शिवला सपोर्ट केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT