Priyanka Chopra
Priyanka Chopra Google
मनोरंजन

प्रियंकाच्या बायोपीकमध्ये 'या' अभिनेत्रीला करायचीय मुख्य भूमिका

प्रणाली मोरे

प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra) म्हणजे ब्युटी विथ ब्रेन असं बेस्ट कॉम्बिनेशन लाभलेलं जागतिक दर्जाच व्यक्तीमत्त्व. आता अमेरिकन सिंगर निक जोनसची बायको झाली म्हणून तिला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झालं तर तसं मुळीच नाही. लग्नाआधीच तर तिनं काही हॉलीवूड प्रोजेक्टमध्ये काम करून सक्सेस मिळवलं होतं. त्याउपरही ती 2000 सालची 'मिस.वर्ल्ड' विनर आहे हे वेगळं सांगायला नकोच. तिनं आपल्या कामानं,कामातील कर्तुत्वानं ते यश प्राप्त केलंय. आणि अशा प्रियंकावर बायोपीक आला तर नवल नव्हे,तो यायलाच हवा. कारण तिनं अगदी कमी वयात काम करीत यशाच्या रस्त्यावर मार्गक्रमण करायला सुरुवात केलीय. त्यामुळे बायोपीकसाठी लागणारं स्ट्रगल,त्यातून मिळणारं यश,अडचणी,गॉसीप्स,तगडे सिनेमे,तिचं लेखनकौशल्य,हॉलीवूड भरारी,तसंच सिनेमांव्यतिरिक्तचं जास्तीचं असं बरंच तिच्या बायोपीक मध्ये दाखवण्यासारखं आहे.

आता अनेक निर्माते-दिग्दर्शक यावर लवकरच विचार करून शिक्कामोर्तब करतील असं म्हणायला हरकत नाही. आता प्रियंकावर बायोपीक येणार मग त्यातील तिची व्यक्तीरेखा साकारणारी थोडी दिसण्यात,कामात तिच्याशी साधर्म्य साधणारी असावी असा निर्मात्या दिग्दर्शकांचा अट्टाहास असणारंच नाही का. तर त्या सगळ्यांना 2021 मध्ये तब्बल 21 वर्षांनी मिस.युनिव्हर्स किताब जिंकून देणारी हरनाज संधूनं एक नकळत सूचना केली आहे . तुम्ही जास्त अभिनेत्री शोधण्याचा त्रास घेऊ नका. मी आहे इथे तयार. हरनाज संधूनं नुकत्याच एका मुलाखतीत आपल्याला प्रियंका चोप्राच्या बायोपीकमध्ये काम करायला आवडेल अशी इच्छा बोलून दाखवली आहे.

Priyanka chopra miss world 2000 with winning crown & Harnaaz Sandhu miss Universe 2021 with winning crown

प्रियंका चोप्रा '2000' साली 'मिस.वर्ल्ड' हा किताब जिकंली होती तर हरनाज संधूनं '2021' मध्ये 'मिस.युनिव्हर्स' हा किताब जिंकला तेव्हाचे क्षण कैद केलेले हे दोन छायाचित्र आहेत.

हरनाज संधू जेव्हा 'मिस.युनिव्हर्स' किताब जिंकली होती तेव्हा तिनं आपण प्रियंकाचे फॅन आहोत,तिला फॉलो करते ब-याच बाबतीत,तिनं तिचं करिअर ज्या प्रकारे घडवलंय त्याचा मला अभिमान आहे असंही सांगितलं होतं. आता पहायचं की कोणता निर्माता-दिग्दर्शक हरनाज संधूची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार होतोय. अर्थात ही इच्छा व्यक्त करून तिनं अनेक निर्मात्या-दिग्दर्शकांना मोठा विषयच दिला आहे सिनेमा बनवण्यासाठी,नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT